कोकण

खारेपाटण पूरस्थितीची खासदार राणेंकडून पाहणी

CD

96018

खारेपाटण पूरस्थितीची खासदार राणेंकडून पाहणी
व्यापारी, नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून; तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १० : मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती यामुळे खारेपाटमधील व्यापारी, नागरिक यांचे मोठे नुकसान झाले. या पूरस्थितीची पाहणी खासदार नारायण राणे यांनी केली. यावेळी त्‍यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्‍यांच्या समस्या जाणून घेतल्‍या. त्‍यानंतर सर्व नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
श्री. राणे यांनी खारेपाटण बाजारपेठ परिसराचा दौरा केला. त्‍यांच्यासोबत प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, तसेच आरोग्य, वीज, कृषी या सर्वच खात्याचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, उपसरपंच महेंद्र गुरव, रवींद्र जठार, तृप्ती माळवदे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्राजल कुबल, सूर्यकांत भालेकर, सुधीर कुबल, राजू वरूनकर, मनाली होनाळे, क्षितिजा धुमाळे, किरण कर्ले, दक्षता सुतार, आस्थाली पवार, शेखर शिंदे, उज्वला चिके, वीरेंद्र चिके, इस्माईल मुकादम, कुरंगावणे सरपंच पप्पू ब्रह्मदडे,अविनाश गाठे, पिंटू सर्पे आदी उपस्थित होते.
श्री. राणे यांनी येथील मासळी मार्केट, चिकन विक्रेते मेडिकल, धान्य मालाची दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने, मोबाईल शॉप, हार्डवेअर आदी नुकसानग्रस्त दुकान व्यावसायिकांची भेट घेऊन त्‍यांच्याशी चर्चा केली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देखील पूरस्थितीची माहिती घेतली.
यावेळी खासदार राणे म्हणाले, प्रशासनाला नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करून येणाऱ्या वर्षात मे महिन्याच्या आधी नदीचा गाळ काढला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT