कोकण

पान एक-केसरी-फणसवडे घाटमार्गाला मंजूरी

CD

96032
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना संदीप गावडे. बाजूला सागर ढोकरे, भास्कर गावडे.

केसरी-फणसवडे
घाटमार्गाला मंजुरी
आंबोलीला पर्याय; ७० कोटींची तरतूद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः आंबोली घाटाला पर्यायी असलेल्या केसरी-फणसवडे या सव्वानऊ किलोमीटरच्या मार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधिमंडळात सार्वजनिक बांधकामच्या अंदाजपत्रकामध्ये यासाठी तब्बल ७० कोटींची तरतूद केली आहे. कित्येक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार असून आंबोली घाटाला सुरक्षित आणि सक्षम असा पर्यायी मार्ग तयार होणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आज येथे दिली.
त्यांच्यासोबत गेळे सरपंच सागर ढोकरे, भास्कर गावडे आदी होते. ते म्हणाले, ‘‘आंबोली घाटाला पर्यायी मार्ग म्हणून पंचवडे-नेनेवाडी-चौकुळ व आंबोली मार्गाची मागणी होती; परंतु, निधीची तरतूद होत नव्हती. मात्र, रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने कोकणाला पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम मंत्री मिळाले आणि लोकांची मागणी आता पूर्णत्वास येईल. विधिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकामध्ये मंत्री चव्हाण यांनी तब्बल सव्वानऊ किलोमीटरच्या मार्गाला मंजुरी देताना तब्बल ६० कोटी रुपये तरतूद केले आहे. या मार्गामध्ये वनविभागाची येणारी खासगी जमीन लक्षात घेता त्याच्या भूसंपादनासाठी व इतर गोष्टींसाठी स्वतंत्र दहा कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. लवकरच या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामाचा प्रारंभ मंत्री चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. आंबोली घाटाप्रमाणेच नव्याने होणाऱ्या मार्गावरून निसर्गसौंदर्याचा आनंद लुटता येणार आहे. या मार्गामुळे जवळपास पाच ते सहा किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. वेळही वाचणार असून, सुरक्षित असा हा मार्ग असणार आहे. फणसवडे-नेनेवाडी-चौकूळ व आंबोली असा मार्ग जाणार आहे. या मार्गाचे शिल्पकार रवींद्र चव्हाणच असून भविष्यातही जिल्ह्याला मोठा निधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.’’
ते म्हणाले, ‘‘आंबोली घाटमार्ग दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याने पर्यायी मार्ग म्हणून केसरी-फणसवडे-चौकुळ मार्गाची मागणी कित्येक वर्षे होती. अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांनीही याबाबत आवाज उठवला होता; परंतु अपेक्षित निर्णय होत नव्हता. आता मंत्री चव्हाण यांनी या मार्गाला मंजुरी दिल्याने एक प्रकारे आंबोली घाटमार्गाला सक्षम असा पर्याय निर्माण होणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT