कोकण

राजापुरातील ग्रामपंचायत निवडीच्या हलचाली

CD

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी हालचाली

मतदार याद्या प्रसिद्ध ; राजापुरातील आठ पोटनिवडणुका
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १०ः विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोटनिवडणुका आणि आगामी काळात मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. येथील तहसील कार्यालयाकडून त्या त्या ग्रामपंचायत कार्यालयांसह तलाठी सजा कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
पोटनिवडणुकांमध्ये तालुक्यातील आठ ग्रामपंचायती तर पंचवार्षिक निवडणुका होऊ घातलेल्यांमध्ये अठरा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर सोमवारपर्यंत (ता.१५) तहसील कार्यालयामध्ये हरकती व सूचना दाखल करावयाच्या असून त्यावर चर्चा अन् निर्णय होऊन शुक्रवारी (ता. १९) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोटनिवडणुका घेण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत.
वर्षभरामध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्यामध्ये ग्रामपंचायतींच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालय प्रशासनाकडून आज प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांवर ज्यांना हरकती दाखल करायच्या आहेत त्यांनी निर्धारित कालावधीमध्ये हरकती दाखल करण्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
-----
पोटनिवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती
कोळवणखडी, नाणार, झर्ये, वडदहसोळ, येळवण, वाल्ये, पांगरीखुर्द, रायपाटण, हातिवले, तळगाव, खरवते, मोसम, केळवली, ससाळे, माडबन, भालावली, उन्हाळे, कोंड्येतर्फ राजापूर.
-----
येथे होणार सार्वत्रिक निवडणुका
भू, पेंडखळे, तेरवण, खिणगिणी, कणेरी, दसूर, शेढे, कोंड्येतर्फ राजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘अँटी ड्रोन सिस्टीम’चा वापर; विनाकारण ड्रोन उडविणाऱ्यांवर होणार पोलिसांची कारवाई

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT