कोकण

क्राईम

CD

एसटीला धडक प्रकरणी
दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः शहराजवळील खेडशी-गयाळवाडी फाटा येथे निष्काळजीपणे दुचाकीस्वाराने एसटीला समोरून धडक दिली. या अपघातप्रकरणी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन मधुकर वाडकर (वय ३९, निळमणी आर्केड, गयाळवाडी, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. ४) दुपारी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित वाडकर हे दुचाकी घेऊन रत्नागिरी ते हातखंबा असे जात असताना गयाळवाडी येथे दुचाकी निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या विरुद्ध बाजूस जाऊन हातखंबाहून येणाऱ्या एसटीला समोरून ठोकर दिली. यामध्ये स्वार वाडकर जखमी झाला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्र खापरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
----------------
वडील रागावल्याने मुलाचा
गळफास घेण्याचा प्रयत्न

रत्नागिरी ः जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगा पबजी गेम खेळत होता. त्यावरून त्याच्या वडिलांनी धाक दिला या रागातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ९) सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला मोबाईलवर पबजी गेम खेळण्याचा नाद लागला होता म्हणून वडिलांनी कामावर जाता जाता गेम खेळू नकोस, असे सांगितले. याचा राग मनात धरून त्या मुलाने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. घरातील मंडळींनी त्याची तत्काळ सोडवणूक केली. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT