कोकण

सावंतवाडीत पाणीपुरवठा आणखी दोन दिवस बंद

CD

सावंतवाडीत पाणीपुरवठा
आणखी दोन दिवस बंद
सावंतवाडीः शहरातील अनेक भागांत पालिकेतर्फे होणारा पाणीपुरवठा सध्या बंद आहे. नरेंद्र डोंगरावर पाईप लाईनवर दरड कोसळल्याने हा पाणीपुरवठा बंद आहे. रविवारपासून (ता. ७) हा पुरवठा बंद असून, पालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु या प्रयत्नांना यश न आल्याने अखेर पालिकेने आणखी दोन ते तीन दिवस पाईपलाईनची दुरुस्ती होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पत्र दिले आहे. मुख्याधिकार्‍यांनी हे पत्र दिले आहे. सावंतवाडी नरेंद्र डोंगर भागातील सलाम तहसीलदार यांचे घराजवळ पाण्याच्या पाईप लाईनवर दरड कोसळलेली असून पाण्याची पाईप लाईन फुटलेली आहे. सालईवाडा करोल दुकानजवळील कॉलनी, सालईवाडा टोपले घर ते मुंज, पेडणेकर घरापर्यंत, पेडणेकर घर ते मोरडोंगरी, गणेशनगर, मराठा समाज वसतिगृहाजवळील कॉलनी व सर्वोदयनगर येथील पाणीपुरवठा पुढील २ ते ३ दिवस पाण्याच्या पाईप लाईनची दुरुस्ती होईपर्यंत बंद राहणार आहे.
------------
शिक्षकांचे आजपासून
सिंधुदुर्गनगरीत उपोषण
ओरोसः पवित्र पोर्टलमार्फत गणित, विज्ञान विषयांच्या नियुक्त करण्यात आलेल्या ७६ पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्यावी, या मागणीकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने उद्यापासून (ता. १०) बेमुदत साखळी उपोषण छेडण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतर्फे २०१९ मध्ये नियुक्ती देण्यात आलेल्या या शिक्षकांपैकी ७३ पदवीधर शिक्षकांनी तीन वर्षे समाधानकारकरित्या शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर या शिक्षकांचे नियमित आदेश निर्गमित करतांना चुकीचे पद व वेतनश्रेणी देण्यात आली असल्याचा आरोप शिक्षक समितीने केला आहे. ग्राम विकास विभागाने गणित, विज्ञान प्राथमिक पदवीधर शिक्षक पदाला एस-१४ वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले आहेत; मात्र पदवीधर शिक्षकांना त्यांचे पद व वेतनश्रेणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याच मागणीसाठी ७ नोव्हेंबर २०२३ ला धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी वेतनश्रेणी लागू केली जाईल, असे आश्वासन संघटनेला देण्यात आले होते; मात्र कार्यवाही झाली नाही. या मागणीसाठी उद्यापासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी स्पष्ट केले.
-----------------
पुरात अडकलेल्या
प्रवाशांना वाचविले
कडावलः दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कडावल व आवळेगाव सीमेवरील पीठढवळ नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे दोन्ही बाजूने वाढत चाललेल्या पाण्यात रविवारी (ता. ७) दुपारी दुचाकीस्वारांसह एसटी प्रवासी मिळून ३५ ते ४० जण अडकले होते. त्यांचा जीव धोक्यात असल्याचे समजताच कडावल बाजारपेठ मित्रमंडळाचे कार्यकर्ते व रिक्षा युनियनच्या रिक्षा चालकांनी तेथे धाव घेत अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे. ही घटना एसटी बस चालक डिसोजा तसेच आवळेगाव येथील रहिवासी व कडावल बाजारपेठेतील कृषी उत्पादक विक्रेते लालू सावंत यांनी पाहिली आणि विविध यंत्रणांशी तत्काळ संपर्क साधला. कडावल येथील माजी सरपंच विद्याधर मुंज, उत्तम मुंज, चेतन मोरजकर, सर्वेश वर्देकर, राज मुंज, राहूल मोरजकर, सुहास चव्हाण व बाजारपेठ मित्रमंडळाच्या अन्य तरुण कार्यकर्त्यांनी व रिक्षाचालक प्रमोद कदम, बाबल्या जाधव तसेच प्रा. अरुण मर्गज व ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. त्यांनी मानवी साखळी करून रस्त्यावर चहुबाजूने पाण्याने वेढलेल्या त्या प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढले.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT