कोकण

बिबट्याने केली हॉटेलमध्ये शिरून कुत्र्याची शिकार

CD

बिबट्याने केली कुत्र्याची शिकार

साखरप्यातील हॉटेलमधील घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १० ः रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर साखरपा येथे एका हॉटेलमध्ये बिबट्या शिरला आणि रिसेप्शन टेबलजवळ बसलेल्या कुत्र्याला उचलून निघून गेला. हा प्रकार मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री घडला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे लक्षात आली. कुत्र्याच्या आवाजामुळे हॉटेलमध्ये झोपलेला कर्मचारी जागा झाला; मात्र तोपर्यंत बिबट्या कुत्र्याला घेऊन निघून गेला होता.
साखरपा परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोनजण जखमी झाल्याचे प्रकार घडले होते; मात्र हल्ला करणारा बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्यानंतर या परिसरातील ग्रामस्थांनी निःश्वास सोडला होता. त्यानंतर मंगळवारी दुसरा बिबट्या आढळल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बिबट्या शिरला आणि रिसेप्शन टेबलच्या बाजूला झोपलेल्या कुत्र्याला पकडून निघून गेला. सुदैवाने, रिसेप्शनच्या टेबलवर कोणीही बसलेले नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे उघड झाली. या परिसरात नवा बिबट्या दिसल्यामुळे नेमके किती बिबटे या भागात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT