कोकण

बांद्यातील कुशल, अकुशल युवकांना कंपनीत नोकरी द्या

CD

swt108.jpg
96154
बांदाः येथे खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना उपसरपंच बाळू सावंत. सोबत ग्रामपंचायत सदस्य व कंपनीचे अधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यातील कुशल, अकुशल
युवकांना कंपनीत नोकरी द्या
राजाराम परबः व्यवस्थापनास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १०ः बांदा-वाफोली रस्त्यावर गवळीटेम्ब येथे सुरू झालेल्या नवीन खासगी कंपनीत स्थानिक कुशल व अकुशल युवकांना नोकरीत सामावून घ्या, अशी मागणी बांदा ग्रामपंचायतीच्यावतीने उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. याठिकाणी कार्यरत असलेल्या पै काणे कंपनीच्या आवारात दुसरी खासगी कंपनी नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या कंपनीला मनुष्यबळाची मोठ्या संख्येने गरज असून, कंपनीत नोकरीसाठी जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी रीतसर निवेदन देखील कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. कंपनी व्यवस्थापनाने कंपनी ही बांदा गावात सुरू करण्यात आली असून, शैक्षणिक पात्रतेनुसार अधिकाधिक स्थानिकांनाच प्राधान्य देण्याचे आश्वासन यावेळी दिल्याची माहिती सावंत यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, रत्नाकर आगलावे, साईप्रसाद काणेकर, आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, शिल्पा परब उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : गोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

Mango Cashew Crop : अवकाळी हवामानाचा दुहेरी फटका; गारपीट, वादळ आणि वीज कोसळल्याने शेती व उद्योग दोन्ही संकटात

SCROLL FOR NEXT