कोकण

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

CD

-rat१०p१७.jpg-
P२४M९६१४७
स्वरा जाधव, श्रुतिका पाटील, संस्कृती तरंगे, नभा चव्हाण.
---------------
साखरप्यातील कन्या शाळाचे यश

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जि. साखरपा (ता. संगमेश्वर) जि. प. आदर्श पद्मा कन्या शाळेतील एक विद्यार्थिनी राज्य गुणवत्ता यादीत व तीन विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. यशाची परंपरा शाळेने कायम राखली.
स्वरा जाधव (८६.५७ टक्के) हिने राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकावला. श्रुतिका पाटील (८५.९०) जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक, संस्कृती तरंगे (६९.७९) जिल्हा गुणवत्ता यादीत १०९ क्रमांक, नभा चव्हाण (६७.११) जिल्हा गुणवत्ता यादीत १४० क्रमांकाने शिष्यवृत्तीधारक झाल्या. या यशाबद्दल कोंडगाव, साखरपा गावातील पालक, ग्रामस्थ व शैक्षणिक स्तरातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वरा हिची यापूर्वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षेत जवाहर नवोदय विद्यालय पडवे राजापूर येथे निवड झाली आहे. वर्गशिक्षक सुनील चौरे व रेश्मा पाटील यांचे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शन मिळाले. विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याचा नेहमीच ही शाळा प्रयत्न करत असते. गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी तानाजी नाईक, केंद्रीय प्रमुख भाटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मुग्धा जोगळेकर, उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे, मुख्याध्यापिका खानविलकर, सहकारी शिक्षक या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT