कोकण

चिपळुणात पावसामुळे १५ लाखाचे नुकसान

CD

चिपळुणात पावसामुळे १५ लाखांचे नुकसान

मार्गताम्हानेला फटका ; अंगणवाडी, आरोग्यकेंद्र, शाळांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः दोन दिवसांपूर्वी तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उमरोलीत एका हॉटेलमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले असून, मार्गताम्हाणे गावाला मोठा फटका बसला आहे. वाघिवरेत अंगणवाडी, बामणोलीत आरोग्यकेंद्र, सार्वजनिक शाळेचे नुकसान झाले याशिवाय पेढे-कुंभारवाडीत शाळेवर झाड पडून महिला जखमी झाली आहे. सध्या या घटनांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
तालुक्यात गेले दोन-तीन दिवस जोरदार पाऊस पडला. गावागावात मोठी पडझड झाली असून, सध्या या घटनांचे पंचनामे करण्याचे काम तलाठी करत आहेत. त्यानुसार येथील तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १५ लाखाचे नुकसान झाले आहे. उमरोली येथे सुरेखा चव्हाण यांच्या शेतकरी मळा या हॉटेलमध्ये अतिवृष्टीमुळे पाणी शिरल्याने त्यांचे १० लाखाचे नुकसान झाले आहे. नारदखेरकी येथील सुनीता हुमरे यांच्या कौलारू घराचे ८० हजाराचे नुकसान झाले असून धोका निर्माण झाला आहे. परिणामी त्यांचे शेजाराच्या घरात स्थलांतर करण्यात आले आहे.
वाघिवरे-भोईवाडी अंगणवाडी संरक्षण भिंत कोसळून २० हजार, बामणोली आरोग्यकेंद्राची संरक्षण भिंत कोसळून ३० हजार रुपये, बौद्धवाडी येथील सार्वजनिक शालेय कोसळून ३५ हजार, कात्रोळी येथील रंजित जाधव यांच्या गोठ्याचे ६ हजार ५०० रुपये, शिरगाव येथील शेवंती गोटल यांच्या घराची भिंत कोसळून २० हजार, प्रकाश नागे यांच्या घराची भिंत कोसळून ४० हजार, मार्गताम्हाणे येथे पऱ्याचे पाणी घरात घुसून रामचंद्र गावणंग यांचे ९५ हजार, गुलाब पवार यांचे ७० हजार, साहेबराव चव्हाण यांचे ६५ हजार रुपये, निर्व्हाळ येथील अमित वाघे यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळून ६ हजाराचे नुकसान झाले आहे तसेच पेढे-कुंभारवाडी येथील शरद पडवेकर यांच्या घराशेजारील शाळेवर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले. तिथे काम करणाऱ्या सुप्रिया पडवेकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मालदोली, वडेरू आदी गावांमध्ये लहान-मोठ्या दरडी कोसळल्या. त्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : कऱ्हाडला नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद; पोलिस बंदोबस्तातही वाढ

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT