कोकण

-गुहागरला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

CD

गुहागरात कर्मचाऱ्यांचा सत्कार

सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समिती ; जनरल सभेत गौरव
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १० : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीच्या तालुका शाखा गुहागर पेन्शनर्स संघटनेची जनरल सभा पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात झाली. यामध्ये गुहागर पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संघटना अध्यक्ष दत्तात्रय गुरव, कोषाध्यक्ष विश्वनाथ बेलवलकर, जिल्हा कोषाध्यक्ष कृष्णा उकार्डे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य व विभागीय अध्यक्ष दिवाकर कानडे, कार्याध्यक्ष विश्वास बेलवलकर आदी उपस्थित होते. सेवानिवृत्तांची तत्परतेने व आत्मियतेने वेळीच कामे केल्याबद्दल अतिउत्कृष्ट कामासाठी संतोष गमरे (सहाय्यक प्रशासन अधिकारी), वैभव कदम (सहाय्यक प्रशासन अधिकारी), संदीप बागकर (वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग), आशिष शिगवण (कनिष्ठ सहाय्यक), किरण शिंदे (पदवीधर शिक्षक), समीर आंब्रे (कनिष्ठ सहाय्यक) आदींचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी यांचे सेवानिवृत्तीसंबंधीचे प्रस्ताव, सेवापुस्तके अद्यावतीकरण, सेवानिवृत्ती नंतरचे लाभ मिळवून देणे आदींबाबतच्या अतिउत्कृष्ट सेवेबद्दल अधिकारी, कर्मचारी यांचा जनरल सभेत गौरव करण्यात आला तसेच सन २०२४ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT