कोकण

अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला कला गौरव पुरस्कार

CD

अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला
कला गौरव पुरस्कार
बांदा, ता. १० ः मानवी जिवंत पुतळ्याची (स्टॅच्यू) कला सादरीकरण करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गरजू विद्यार्थी व समाजातील गरजवंत व्यक्तींना मदत करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईतील सोहळ्यात लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अलाईव्ह ग्रुपमधील मनोज कल्याणकर, विश्वास सावंत व उर्वेश पावसकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. स्टॅच्यू अलाईव्ह ग्रुपचे संस्थापक मनोज कल्याणकर यांनी सर्वप्रथम जिवंत मानवी पुतळे हुबेहूब साकारत सर्वांची वाहवा मिळविली होती. बांदा शहराचा सांस्कृतिक महोत्सव असलेल्या दीपावली शो टाईममधून ही कला सर्वदूर पोहोचली होती. आजपर्यंत गोवा, महाराष्ट्र राज्यांत अनेक सांस्कृतिक महोत्सव तसेच कार्यक्रमात अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपने जिवंत मानवी पुतळे सादर केले आहेत. केवळ स्पर्धेत भाग न घेता सामाजिक बांधिलकी जोपासत कोकण तसेच महाराष्ट्रातील अनेक मतिमंद, विकलांग शाळांना व वृद्धाश्रमांना मिळालेल्या उत्पनातून मदत करत खऱ्या अर्थाने सामाजिक वारसा जोपासला आहे. त्यांच्या या कार्यासाठी राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara fraud Case: तमिळनाडूच्या महिलेची साताऱ्यात फसवणूक; १२ लाख अन् सात ताेळे साेने, परस्‍पर विक्री, विश्वास नडला, नेमकं काय घडलं!

Paithan News: जायकवाडी धरणाचा वीजपुरवठा अखेर पूर्ववत ; नाथसागर धरण अंधारात

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

SCROLL FOR NEXT