कोकण

किन्हळ गावात आंब्याच्या जातींचे प्रदर्शन

CD

-rat१०p३८.jpg -
२४M९६२३३
दापोली ः किन्हळे येथील प्रदर्शनातील देशी-विदेशी आंब्याच्या वाणांची पाहणी करताना शेतकरी.
---------------

किन्हळमध्ये आंब्याच्या जातींचे प्रदर्शन

कृषी महाविद्यालय ; आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवली

सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. १० ः दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थिंनीच्या मृदगंध गटाने दापोली तालुक्यातील किन्हळ गावात खांणजाई देवी मंदिरात आंब्यांच्या विविध देशी व परदेशी जातींचे प्रदर्शन आयोजित केले होते.
प्रदर्शनात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत विकसित केलेल्या कोकण राजा, सिंधू, रत्ना आणि याबरोबरच काही देशी आणि विदेशी वाणांचा समावेश करण्यात आला होता. या प्रदर्शनावेळी विद्यार्थिनींनी विविध आंब्यांच्या वाणांची मुख्य गुणवैशिष्ट्ये समजावून सांगितली. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी किन्हळ गावात दाखल झाल्या असून, पुढील १९ आठवडे गावात राहून शेती आणि त्या संबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके आयोजित करणार आहेत. त्याचबरोबर विविध विस्तार शिक्षणपद्धतींचा वापर करून तंत्रज्ञान प्रसाराचे काम करणार आहेत. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी संपर्क शेतकरी प्रशांत चिपटे आणि इतर सर्व ग्रामस्थांनी मदत केली. प्रदर्शनासाठी किन्हळ गावातील ४९ शेतकरी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
कल्याणी आगवणे, वेदिका भोळे, त्रिवेणी जाधव, जान्हवी कारंडे, मृणाल मेटील, सिमंतीनी पाटील, मेधावी शिंदे, निष्ठा कुवेसकर, निकिता पिलाने या कृषिकन्यांनी सहभाग घेतला होता.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT