कोकण

मत्स्य महाविद्यालयात राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन

CD

-rat१०p३६.jpg-
२४M९६२२८
रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालयात राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिनानिमित्त कोळंबी संवर्धकांचे अभिनंदन करताना डॉ. सुधाकर इंदुलकर.
---------

राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. ११ : शिरगांव मत्स्य महाविद्यालय राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन साजरा करण्यात आला. मत्स्य महाविद्यालयाने चार दिवसांपूर्वीच कोळंबी बीज संचयन केलेल्या महाविद्यालयाच्या आवारातील संवर्धन तलाव येथे कार्यक्रम आयोजित केला होता.
मत्स्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सद्या कोळंबी संवर्धन क्षेत्रात रत्नागिरी परिसरात कार्यरत असलेले कोळंबी संवर्धक भूपेंद्र परब, आकाश बंडागळे, अनिकेत निवदेकर, नीलेश सावंत, आकाश नाचरे, संकेत हळदणकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सर्वांचे स्वागत आणि त्यांच्या व्यावसायिक यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रम मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य संवर्धन व मत्स्य जलशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक डॉ. मिलिंद सावंत यांनी केले. मत्स्य संवर्धन विभागप्रमुख डॉ. अनिल पावसे यांनी विद्यार्थ्यांना कोळंबी संवर्धनाबाबत शास्त्रीय माहिती दिली. मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधाकर इंदुलकर यांनी मत्स्य संवर्धक दिनाचे महत्व विषद केले. विद्यार्थ्यांनी कोळंबी संवर्धन क्षेत्रात उतरून उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. गजानन घोडे यांनी केले.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meerut Blue Drum Murder : देशभरात गाजलेल्या 'निळा ड्रम' हत्याकांडाचा निकाल; मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा!

पांढऱ्या भिंती, बेड नाही, सोफा नाही; सुशांत सिंह राजपूतच्या घरात अशी राहतेय अदा शर्मा; म्हणते- ज्यांना बसायचंय त्यांनी...

Maharashtra Live News : पुण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह

Mohol Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी मोहोळ तालुका त्रासला; खंडाळी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

ICC T20I Ranking: ईशान किशन-अभिषेक शर्माला टक्कर देणार श्रेयस अय्यर! क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप

SCROLL FOR NEXT