कोकण

शिष्यवृत्ती परीक्षेत उर्वी खराबीचे यश

CD

96248

शिष्यवृत्ती परीक्षेत
उर्वी खराबीचे यश
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. ११ : शासनाच्यावतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरलीची उर्वी खराबी हिने मालवण तालुक्यातून ग्रामीण प्रभागात तिसरा क्रमांक प्राप्त करत जिल्ह्याच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. याबद्दल वेरळ पंचक्रोशीत उर्वीसह प्रशालेचे समाजातील सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. वेरळ सरपंच धनंजय परब, उपसरपंच दिनेश परब, केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी, प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण पोयरेकर, उपाध्यक्ष सिल्व्हिया लोबो व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, प्रशालेच्या माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका शुभदा रेडकर, गणेश रेडकर आदी मान्यवरांनी शाळेला भेट देऊन उर्वी हिचे तसेच मुख्याध्यापक राजेंद्र धारपवार, मार्गदर्शक शिक्षक उमेश खराबी, विमल खराबी, अविनाश उबाळे यांचे अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी संजय माने, वेरळ ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे माजी शिक्षक, पालक, वेरळ ग्रामस्थ आणि शाळेचे माजी विद्यार्थी यांनी उर्वीचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT