कोकण

बिबट्या मृत्यू

CD

96275


सोलगावजवळ आढळला
मृतावस्थेतील बिबट्या
राजापूर, ता. १० ः तालुक्यातील सोलगाव, देवीची गुरववाडी येथील वसंत नारायण गुरव यांच्या घराच्या बाहेर बिबट्या मृतावस्थेत आढळला. भूक न भागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोलगाव, देवीची गुरववाडी येथील वसंत गुरव मुंबईला वास्तव्यास असून त्यांचे घर बंदस्थितीत असते. आज दुपारी गुरव यांच्या घराशेजारी बिबट्या असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र घराबाहेर असलेला बिबट्या मृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बिबट्याची तपासणी करण्यात आली. मृत बिबट्या मादी असून ५ ते ६ महिने वयाचा असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. भूक न भागल्याने तो मृत झाल्याचा अंदाजही वन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यावेळी रत्नागिरी परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, राजापूर वनपाल जयराम बावदाणे, रत्नागिरी लेखापाल तानाजी पाटील, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार यांच्यासह अनिकेत मोरे, नीतेश गुरव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT