कोकण

श्रमदानातून तुरळ-चिखली रस्त्यावरील भरले खड्डे

CD

- rat११p७.jpg -
P२४M९६२९७
संगमेश्वर ः तुरळ-चिखली रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून भरताना रिक्षाचालक.

श्रमदानातून तुरळ-चिखली रस्त्यावरील भरले खड्डे

रिक्षाचालकांचा पुढाकार ; सामाजिक बांधिलकीचे कौतुक, बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः तालुक्यातील तुरळ-कडवई-चिखली या रस्त्याच्या दुरुस्तीला होत असलेला विलंब लक्षात घेऊन नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी रिक्षाचालकांनी स्वःखर्चाने श्रमदानातून खड्डे भरले आहेत. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक स्थानिक ग्रामस्थांमधून कौतूक होत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-कडवई-चिखली रस्त्याचे काम भरपावसात केल्यामुळे पहिल्या पावसातच रस्त्याला खड्डे पडू लागले आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला रिक्षाचालक-मालक संघटनेकडून निवेदन देण्यात आले. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. कडवईतील या रस्त्याला सर्व ठिकाणी गटारे नाहीत आणि काही ठिकाणी मोऱ्या काढणे गरजेचे होते. त्याकडेही दुर्लक्ष झाले. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्त्यावर टाकलेले डांबर ठिकठिकाणी उखडू लागले आहे. नागरिकांना या खड्ड्यातून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. या कटकटींना कंटाळून पाऊस थांबताच रिक्षाचालक मालक संघटनेच्यावतीने खड्डे भरणीचे काम करण्यात आले. रिक्षाचालक-मालक संघटनेने रस्ता दुरुस्तीविषयी ठेकेदाराशी चर्चाही केली. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सूचित केले गेले. तरीही दोघांनी रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. परिणामी, खड्डे मोठे होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

यांनी घेतला पुढाकार
रस्ते दुरुस्तीला होत असलेला विलंब व नागरिकांना होणार त्रास पाहून रिक्षाचालक संदीप चिले, श्रीकांत डिंगणकर, तुषार कदम, महेश कानाल, उदय चाचे, नितीन कानाल, अनिकेत पवार, सुधीर पंडव, रफिक काझी यांनी एकत्र येत तुरळ-कडवई-चिखली मार्गावरील खड्डे भरण्याचे काम स्वखर्चाने केले. रिक्षाचालकांच्या या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT