कोकण

भातलावणी कामाचा घेतला आनंद

CD

- rat११p१२.jpg
२४M९६३२९
ः दापोली ः शेतात लावणी करताना चंद्रनगर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक.

विद्यार्थ्यांनी घेतला भातलावणीचा आनंद

चंद्रनगर शाळेचा उपक्रम ; शेती कामाचे दिले धडे

सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. ११ ः शेतीप्रधान भारत देशात शेती कशी केली जाते? याचे संपूर्ण ज्ञान अवगत करण्यासाठी दापोली तालुक्यातील चंद्रनगर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना येथील मिसाळांच्या शेतामध्ये उतरून शेतीचे धडे दिले. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भातलावणी कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या शाळेतील शिक्षक मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत यांनी आधीच नियोजन केल्यानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना पारंपरिक भातलावणीच्या कामांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी गावातील शेतकरी असलेल्या सचिन मिसाळ यांच्या शेतात घेऊन गेले होते. त्यांच्या शेतात सर्व विद्यार्थ्यांनी इतर शेतकऱ्यांसोबत तरवा काढणे, चिखल करणे, चिखलासाठी नांगर फिरवणे, भाताची लावणी करणे यांसारखी कामे केली. शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत भातलावणीची कामे केली. या वेळी सचिन मिसाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी भाजीभाकरीच्या न्याहरीची व्यवस्था केली होती. शेतात काम करताना व भातलावणीची सारी कामे करताना शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक शेतात रममाण झाले होते.

------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT