कोकण

डॉक्टर्स, सीए यांचा सत्कार

CD

-rat९p२६.jpg -
२४M९५८७९
चिपळूण ः डॉ. चेतन पाटील यांचा सन्मान करताना रोटरीचे पदाधिकारी.
----------

डॉक्टर्स, सीए यांचा
रोटरीतर्फे गौरव

चिपळूण : येथील रोटरी क्लब ऑफ चिपळूणतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश पालशेतकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला उपक्रम घेण्यात आला. या वेळी सचिव राजेश, खजिनदार स्वप्नील चिले उपस्थित होते. डॉक्टर डे व सीए डे साजरा करताना रोटरीचे सभासद डॉ. रत्नाकर घाणेकर, डॉ. विकास नातू, डॉ. अतीन अवताडे, डॉ. ओंकार शर्मा, डॉ. अमेय बेडेकर, डॉ. नोमान अत्तार, डॉ. कवठेकर, डॉ. शोएब खतीब, डॉ. चेतन पाटील, सीए विवेक रेळेकर सर यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. विकास नातू व सीए विवेक रेळेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास वैभव रेडीज, राजीव गांधी, प्रसाद सागवेकर व इतर उपस्थित होते.
--------------
किरबेट केंद्रशाळेत
संगणक कक्षाचे उद्‍घाटन

साखरपा ः नजीकच्या किरबेट येथील केंद्रशाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन पिढी संगणक साक्षर व्हावी या उद्देशाने हा कक्ष तयार करण्यात आला आहे. आगामी काळात संगणक हे एक जागतिक माहितीचे केंद्र बनणार आहे. संगणक साक्षरता हा नवीन आयाम निर्माण होण्यास प्रारंभ झाला आहे. यात नवीन पिढी मागे राहायला नको या विचारातून किरबेट येथील केंद्रशाळेत विद्यार्थ्यांसाठी नवीन संगणक कक्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी कोणतेही शासकीय अनुदान न घेता केवळ लोकसहभागातून या कक्षाची निर्मिती केली आहे. कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी उद्योजक अमोल भोजने उपस्थित होते. साखरपा केंद्राच्या केंद्रीय प्रमुख दिव्या भाटकर, माजी केंद्रीय प्रमुख रामचंद्र कुवळेकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक पत्की, उद्योजक विठोबा गोरूले, मुख्याध्यापिका अरूणा सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT