कोकण

सैतवडे गुंबद परिसरात डेंगीचा प्रादुर्भाव

CD

सैतवडे गुंबद भागात डेंगीचा प्रादुर्भाव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः जिल्ह्यात पावसाबरोबरच रोगराईने जोर धरला आहे. केवळ दाट वस्ती असलेल्या शहरांमध्ये नव्हे तर ग्रामीण भागातही त्याचा प्रादुर्भाव होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील सैतवडेमध्ये परिस्थिती विदारक झाली असून, गुंबद ग्रामपंचायत हद्दीत डेंगीसदृश तापाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे.
गुंबद परिसरात गेल्या १५ दिवसांपासून डेंगीसदृश रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. प्रत्येक घरामध्ये एक-दोन रुग्ण सापडत आहेत. तरीही आरोग्यखात्याने म्हणावे तसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. आरोग्य विभागाकडून फवारणीसाठी औषध आले आहे; पण त्यासाठी लागणारा पंप उपलब्ध नाही. त्यामुळे फवारणी होऊ शकलेली नाही. याबद्दल जिल्हा परिषद आरोग्य विभागाला ग्रामपंचायतीने माहिती दिली आहे. काही रुग्ण रत्नागिरीत खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात दाखलसुद्धा करण्यात आले आहेत, अशी माहिती सैतवडे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभाग मात्र हातावर हात ठेवून बघ्याची भूमिका घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT