कोकण

बापूसाहेब महाराजांना कुडाळात अभिवादन

CD

बापूसाहेब महाराजांना
कुडाळात अभिवादन
कुडाळः सावंतवाडी संस्थान मराठा समाज (मुंबई-कुडाळ) समितीतर्फे येथील मराठा समाज सभागृहात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची ८७ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ७५ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ आणि क्रीयाशील कार्यकर्ते सुभाष सावंत-प्रभावळकर यांच्या हस्ते बापूसाहेब महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. संस्थेचे समितीप्रमुख आर. एल. परब, सरचिटणीस नंदू गावडे, गुरुनाथ घोगळे, चंदू कदम, पंढरीनाथ चव्हाण, बाळा राऊळ महिला अध्यक्षा अदिती सावंत भोसले, स्वाती सावंत, डॉ. दीपाली काजरेकर, प्रज्ञा राणे, सीमा परब, बालवाडी शिक्षिका, बालवाडीचे आजी- माजी विद्यार्थी, पालक व शिक्षिका उपस्थित होत्या. डॉ. काजरेकर यांनी महाराजांचा जीवनपट उलगडला. आर. एल. परब यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नंदू गावडे, तर आभार प्रज्ञा राणे यांनी मानले.
.................
भोसले कॉलेजमध्ये
''डी फार्मसी'' कोर्स
सावंतवाडी : शासनाच्या नव्या ध्येय धोरणानुसार सावंतवाडीतील भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ''डी फार्मसी'' हा कोर्स मुलींसाठी मोफत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या कोर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी थेट महाविद्यालयात संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. यासाठी आवश्यक पात्रता विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण अशी आहे. हा एक क्रांतिकारी निर्णय आहे, जो निश्चितच महाराष्ट्रातील मुलींसाठी शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये मोठा बदल घडवून आणेल, असा विश्वास कॉलेजचे प्रा. सत्यजित साठे यांनी व्यक्त केला. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT