कोकण

ःलोकसंख्या दिनानिमित्त सावर्डेत जनजागृती फेरी

CD

-ratchl११८.jpg -
P२४M९६४५७
चिपळूण ः घोषवाक्य स्पर्धेत व जनजागृती फेरीत सहभागी विद्यार्थी.
-------------------

लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती फेरी

सावर्डेतील निकम विद्यालयाचा उपक्रम

चिपळूण, ता. ११ ः सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांद्वारे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून जागतिक लोकसंख्या विस्फोटाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
समाज जागृतीसाठी उपयुक्त अशा पोस्टरांची विद्यार्थ्यांनी निर्मिती केली. जागतिक लोकसंख्या विषयक माहिती देणारे सचित्र भित्तीपत्रक शिक्षिका अपर्णा डिके व सिद्धी सावंत यांनी तयार केले. या भिंत्तीपत्रकाचे उदघाट्न ज्येष्ठ शिक्षक सुरेंद्र अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळ सत्रात अमित साळवी, तर दुपार सत्रात अपर्णा डिके यांनी लोकसंख्या वाढीचे दुष्परिणामांविषयी माहिती दिली. यानिमित्ताने सावर्डे परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT