कोकण

निवळीत सव्वाआठ लाखाचा गुटखा पकडला

CD

९६४६९


निवळीत सव्वाआठ लाखांचा गुटखा पकडला
संशयिताविरुद्ध गुन्हा ः अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ः बंदी असलेल्या गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेने पकडली. तालुक्यातील निवळी येथे ही कारवाई केली. कारवाईत आठ लाखांचा गुटखा आणि वाहन असा १५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बलवंत घोरपडे (वय ३२, रा. मिरज खटाव, सांगली) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई आज सायंकाळी चारच्या सुमारास झाली.

जिल्ह्यात हानिकारक गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांची मदत घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली. आज सकाळी अन्न सुरक्षाचे अधिकारी वि. जे. पाचपुते, गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस फौजदार आकाश साळुंखे यांच्यासह पथकाने निवळी येथे सकाळी साडेसात वाजता सापळा रचला. साडेआठच्या सुमारास सांगलीहून श्रीक्षेत्र गणपतीपुळेकडे जाणारी मोटार (एमएच ०९ एपी ४५४५) तपासणी केली. तेव्हा या वाहनामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी तंबाखू असा सुमारे ८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. वाहनाची किंमत ७ लाख २५ हजार असून १५ लाख २० हजार ११६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या वाहनात सूरज राजू साळुंखे व वाहन चालक विशाल घोरपडे दोघे होते. घोरपडे वाहन चालवत होता. त्यांची चौकशी केली असता बंदी असलेला गुटखा घेऊन गणपतीपुळे येथे जात असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने संशयितांना ताब्यात घेतले. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित चालक विशाल घोरपडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


गुटखा सेवनापासून दूर राहा
गुटखा विक्री बंदी आहे. प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू असली तरी चोरटी वाहतूक केली जात आहे. या हानिकारक पदार्थामुळे नागरिकांना कर्करोग होण्याची भीती आहे. जनतेने या सेवनापासून दूर राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT