कोकण

बोगस खत विक्री करणाऱ्यांना रोखा

CD

01507

बोगस खत विक्री करणाऱ्यांना रोखा

सुशांत नाईक : शेतकऱ्यांचे पैसे परत न दिल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.१ : ज्‍या शेतकरी संघांनी, खासगी दुकानदारांनी बोगस खताची विक्री केली आहे, त्‍यांनी खताचे पैसे शेतकऱ्यांना परत करावेत. अन्यथा युवा सेनेच्यावतीने आंदोलन छेडू, असा इशारा युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज दिला.
कणकवली येथील विजय भवन येथील पत्रकार परिषदेत सुशांत नाईक बोलत होते. त्‍यांच्यासोबत युवासेना तालुकाप्रमुख सचिन आचरेकर, शहराध्यक्ष तेजस राणे, धीरज मेस्त्री, भिवा परब, वैभव मालंडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देवगडसह इतर तालुक्‍यातील खरेदी विक्री संघ आणि खासगी दुकानदारांनी ‘कृषीमित्र’ या खताची विक्री केली होती. मात्र, हे खत नंतर बोगस असल्‍याचे कृषी अधिकाऱ्यांच्या तपासणीत निष्पन्न झाले. त्‍यामुळे देवगड खरेदी विक्री संघाने हे खत विक्री केलेल्‍या ५० शेतकऱ्यांना ६२ हजार रूपये परत केले. त्‍याच धर्तीवर इतर खरेदी विक्री संघ आणि खत विक्री केलेल्‍या दुकानदारांनी शेतकऱ्यांना पैसे परत करायला हवेत. तसेच कृषी मित्र या खत कंपनीला काळ्या यादीत टाका, अशी मागणी कृषी विभाग आणि राज्‍य शासनाकडे केल्‍याचीही माहिती श्री.नाईक यांनी दिली.
श्री.नाईक म्‍हणाले, जिल्ह्यातील कणकवली, देवगड, वैभववाडी या शेतकरी खरेदी विक्री संघांमधून शेतकऱ्यांना ‘कृषीमित्र’ हे खत विक्री झाले आहे. या खताबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्‍या. त्‍यानंतर जिल्हा कृषी कार्यालयात युवा सेनेने आंदोलन केले होते. त्यानुसार कृषी पथकाने देवगडमध्ये जाऊन शेतकऱ्यांनी घातलेल्या खताचा पंचनामा करून प्रयोगशाळेत पाठवला. त्‍यावेळी हे खत बोगस असल्‍याचे निष्पन्न झाले. देवगड खरेदी विक्री संघातून ज्या शेतकऱ्यांनी खत घेतले त्या ५० शेतकऱ्यांना खताचे ६२ हजार परत दिले आहे.
---
कणकवलीतून हजारभर बॅगांची विक्री
नाईक म्‍हणाले, कणकवली, वैभववाडीमध्येही ‘कृषीमित्र’ खताची मोठी विक्री झाली आहे. कणकवली खरेदी विक्री संघातून ५०० ते १००० बॅगांची विक्री झाली आहे. वैभववाडीमध्येही किती खत विक्री झाली याची माहिती मागवली आहे. हे खत वापरल्‍याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्‍या शेतीचे पंचनामे व्हावेत अशी मागणी कृषी विभागाकडे केली आहे. तसेच एक जरी शेतकरी वंचित राहिल्यास शेतकरी संघावर आंदोलन करू, असा इशारा श्री.नाईक यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT