कोकण

ओवळीयेत शिबिरात २० जणांचे रक्तदान

CD

ओवळीयेत शिबिरात
२० जणांचे रक्तदान
ओटवणे ः भाजप युवानेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देवसू पारपोली ओवळीयेतील २० दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे नियोजन भाजप पारपोली बूथ अध्यक्ष मनीष परब, विभागीय अध्यक्ष गजानन उफ अमोल सावंत, देवसू बुथ अध्यक्ष अशोक सावंत, ओवळीये बुथ अध्यक्ष सागर सावंत, देवसू ग्रामपंचायत सदस्य शांताराम सावंत, यशवंत सावंत, दत्ताराम सावंत, मनोज सावंत, विश्वास नाईक, अक्षय गावकर, प्रीतेश कलांगण, सूरज सावंत, प्रकाश सावंत, प्रसाद खामकर आदींनी केले. पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या रक्तपेढीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले. यावेळी संदीप गावडे यांनी रक्तदान शिबिरादरम्यान भेट देऊन कार्यकर्त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी देवसू माध्यमिक विद्यालयाला नारळाची रोपे भेट दिली.
-----------
नाभिक संघटनेमार्फत
उद्या विद्यार्थी गौरव
मसुरे ः मुंबईतील सिंधुदुर्गस्थित नाभिक बांधव संघटनेच्यावतीने मुंबईतील नाभिक ज्ञाती विद्यार्थ्यांचा गुणगौरव संघटनेचे अध्यक्ष अरुण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. ३) दुपारी ३ वाजता दादर येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्गातील मुंबई निवासी नाभिक बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी केले आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय चव्हाण, चित्रपट निर्माती व महाराष्ट्र सलून असोसिएशन माजी अध्यक्ष दीपक यादव, अध्यक्ष प्रसाद चव्हाण, जयवंत लाड, संघटनेच्या उपाध्यक्षा सोनाली चव्हाण व नाभिक ज्ञाती मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी संतसेना स्मारक मंडळाच्या अध्यक्षांचाही सत्कार होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री संतसेना महाराज स्मारक मंडळ, दादरचे अध्यक्ष विलास चव्हाण, खजिनदार शरद पवार, पतपेढी संचालिका चित्रा पवार, उद्योजक रमेश पवार, प्रा. हेमंत सामंत व पोलिस निरीक्षक भास्कर पवार आदी उपस्थित रहाणार आहेत.
-------------
फोंडाघाट प्रशालेत
शहिदांना आदरांजली
फोंडाघाट ः न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेत कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेच्या एनसीसी विभागामार्फत कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. कारगिल युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदेश सावंत, मुख्याध्यापक विजय रासम, प्रा. नारिंगकर, प्रा. फड, एनसीसीप्रमुख आर्या भोगले व एनसीसीचे छात्र उपस्थित होते. प्रा. संतोष जोईल यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT