कोकण

देवरूख ग्रामीण रुग्णालय लवकरच नवीन इमारतीत

CD

- rat१९p८.jpg-
२४N०५३५५

देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत.

देवरूख ग्रामीण रुग्णालयाचे ९० टक्के काम पूर्ण

आरोग्य सेवेतील रिक्त पदाची उणिव आमसभेत ; फर्निचरसह पाण्याच्या टाकीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १९ : देवरूख ग्रामीण रुग्णालय अद्ययावत व्हावे ही तालुकावासियांची अनेक वर्षाची मागणी होती. त्यानुसार निधी मंजूरही झाला. नव्या आराखड्याप्रमाणे २०१९ पासून ग्रामीण रुग्णालय नव्या स्वरूपात उभे राहिले. आतापर्यंत ९० टक्के कामही पूर्ण झाले असून येत्या दहा दिवसात आतील फर्निचर व पाण्याची टाकी उपलब्ध झाल्यास ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात त्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन केले जाईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
संगमेश्वर तालुक्याच्या आमसभेमध्ये नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांना आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. संदीप माने यांनी उत्तर दिले तसेच आमसभेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम यांनी आरोग्य विभागाकडे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा विषय पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडून पुढील कार्यवाही करू, असेही त्यांना सांगितले. देवरूख ग्रामीण रुग्णालयाला ३० बेड मंजूर आहेत. ३० बेडचे रुग्णालय असताना केवळ चार बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णाची संख्या वाढली तर रत्नागिरी अथवा संगमेश्वर येथे रुग्णाला घेऊन जावे लागते. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. या रुग्णालयासाठी तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत; परंतु यातील दोन पदे भरण्यात आली आहेत तर एक रिक्त आहे. यातील एक डॉक्टर प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे रुग्ण तपासणी करण्याची जबबादारी आहे. दिवसाला रुग्णालयात ८० ते ९० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. येथील ३ पदे त्वरित भरणे गरजेचे आहे. आरोग्य विभागातील उणीव आमसभेत मांडण्यात आली. यावर आमदार निकम यांनी सकारात्मक पावले उचलण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. लवकरच या सर्व कामांना गती येऊन नूतन इमारतीत रुग्णसेवा सुरू करण्यात येईल, असा दिलासा त्यांनी दिला.
-----
उपजिल्हा रुग्णालय बनवण्यासाठी प्रयत्न

देवरूख ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या पद्घतीने नवीन इमारतीची रचना करण्यात आली आहे. संगमेश्वर येथील ट्रामा केअरसेंटरमध्येही सुधारणा करण्याबाबत व सुविधा उपलब्ध करण्याबाबत आमसभेत चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्याला आवश्यक निधी देऊ, असे आमदार निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनची कोकणात दमदार एन्ट्री! राज्यातील 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी

Ancient Heritage Discovery : भुदरगड तालुक्यात सापडला मध्ययुगीन काळातील दुर्मीळ ठेवा; ज्योतिर्लिंग मंदिराबाहेर आढळल्या गूढ शिळा, शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात

Abhijit Deepke: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय थांबणार नाही: अभिजित दीपके, कोणावर तरी जबाबदारी निश्चित करावीच लागणार

Monsoon Alert: मॉन्सूनचा वेग मंदावणार; १५ जूनपर्यंत पेरणीची घाई टाळा, शेतकऱ्यांना सरकारचा इशारा

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी ६० टक्के भूसंपादन; संमतिपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत, आतापर्यंत ९०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप

SCROLL FOR NEXT