कोकण

भगवती बंदर क्रुझ टर्मिनसचा अध्यादेश जारी

CD

भगवती बंदर क्रुझ टर्मिनसचा अध्यादेश जारी
उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश; ३०२ कोटींचे अंदाजपत्र
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : शहरातील भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनलला अखेर मंजुरी मिळाली आहे. तसा अध्यादेश शासनाने आज जारी केला. यामध्ये ३०२ कोटी ४२ लाख १० हजार रक्कमेचे अंदाजपत्रक तयार केले आहेत. लवकरच मुंबई ते गोवा या जलमार्गावर जलेश व आंग्रीया या क्रुझला थांबा मिळणार आहे. त्यामुळे पर्यटकांना कोकणातील निसर्गसौंदर्य आणि पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येणार आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या क्रुझ टर्मिनलसाठी विशेष प्रयत्न केले होते. भगवती बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. रत्नागिरी रेल्वेस्टेशनपासून साधारण १९ कि. मी. अंतरावर भगवती बंदर आहे. जवळच विमानतळदेखील आहे. सद्यःस्थितीत मुंबई ते गोवा अशी फेरीसेवा जलेश व आंग्रीया या क्रुझद्वारे सुरू आहे. मुंबई ते गोवा जलमार्गावर महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीमध्ये कोठेही थांबा नाही. त्यामुळे पर्यटकांना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील पर्यटनस्थळे पाहता येत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी पर्यटनस्थळे ही भगवती बंदराच्या आसपास आहेत. त्यामुळे भगवती बंदर येथे सुसज्ज असे क्रुझ टर्मिनल विकसित केल्यास पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. परिणामी, स्थानिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यानुसार भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल विकसित करण्यासंदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळांनी शासनास प्रस्ताव सादर केला आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रस्तावानुसार, २०२२-२३ च्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये ३०२ कोटी ४२ लाख १० हजार १७१ इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ड्रेजिंगसाठी ९ कोटी ५६ लाखाची तरतूद, घाटकाम ५१ कोटी ३१ लाख, पर्याय जेटी २२ कोटी ५७ लाख आदी कामांचा यामध्ये समावेश आहे.

चौकट
या कामांचा समावेश
* गाळ काढून खोदकाम करणे
* धक्का तयार करणे
* लाटविरोधी भिंतीची लांबी वाढवणे
* टर्मिनल इमारत बांधणे
* रस्ता, वाहनतळ व फूटपाथ
* संरक्षक भिंत तसेच आवार भिंत
* विद्युतीकरण करणे
* सांडपाणी उपाययोजना करणे
* बगीचा, अग्निरोधक यंत्रणा उभारणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

घर नाही, पाणी नाही… तरीही एल्फिन्स्टन पूल बाधितांवर स्थलांतराचा तगादा! पुनर्वसनावरून वाद पेटला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला सहा दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT