कोकण

सावंतवाडीत शिवसेनेतर्फे आनंद दिघेंना आदरांजली

CD

07308

सावंतवाडीत शिवसेनेतर्फे
आनंद दिघेंना आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सावंतवाडी शिवसेना शिंदे गटातर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली. येथील राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या श्रीधर आपार्टमेंट संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, सावंतवाडी उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर, सचिव विश्वास घाग, विभागप्रमुख महेश सावंत (कोलगाव), विनायक सावंत (माडखोल), माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, उपशहर संघटक शिवानी पाटकर, उपशाखा संघटक ज्योत्स्ना सुतार, उपविभागप्रमुख संजय पालकर, बूथप्रमुख एकनाथ हळदणकर, उमेश परब, टॅक्सी संघटनाप्रमुख शैलेश मेस्त्री यांची उपस्थिती होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘बाळासाहेब ठाकरे अमर रहे’, ‘आनंद दिघे अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT