कोकण

इच्छुकांची ग्रामीण भागात साखरपेरणी

CD

इच्छुकांची ग्रामीण भागात साखरपेरणी

तयारी निवडणुकीची; सणांवेळी हात सोडले सैल

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू आहे. त्यांना कार्यकर्ते आणि एकगठ्ठा मते सांभाळण्यासाठी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी आदी सणांवेळी हात सैल करावा लागत आहे. निवडणुकीपर्यंत तरी कार्यकर्ते खुश राहू देत, असा विचार करत काही इच्छुकांनी ग्रामीण भागात साखरपेरणी सुरू केल्यामुळे अनेकजण भलतेच खुश दिसत आहेत.
गणेशोत्सवापूर्वी राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर, लागलीच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे अंदाज साऱ्यांचे होते. विधानसभा निवडणुका जाहीर न झाल्याने हे अंदाज फोल ठरले आहेत. लोकसभा निवडणुका संपताच विधानसभा निवडणुकीची राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावा, वाडीवस्तीवरील गावभेटी, लोकांशी संवाद, विविध कार्यक्रमांना उपस्थिती यांची राजकीय पक्षांसह नेतेमंडळी, पुढारी आणि इच्छुकांची रेलचेल वाढली आहे. कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे. गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक म्हटल्यानंतर राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांची भिस्त कार्यकर्त्यांवर असते. इच्छुक उमेदवार नेहमीच कार्यकर्त्यांना सांभाळत असतात. गणेशोत्सवापाठोपाठ दसरा आणि दिवाळी सण येणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी होऊ दे खर्च; पण कार्यकर्ते राहू देत खुश, अशी भूमिका घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT