कोकण

गोखले विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवली नानकटाई

CD

-rat२७p१९.jpg-
OP२४N०७३२४
राजापूर ः धाऊलवल्लीतील गोखले विद्यालयात विद्यार्थ्यांनी नानकटाई बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. याप्रसंगी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी.
-----------

विद्यार्थ्यांनी बनवली नानकटाई

गोखले विद्यालयात किचन कट्टा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २७ ः राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील (कै.) सौ. आनंदीबाई कृष्णाजी गोखले विद्यालयात व्यवसायपूर्व शिक्षणातील गृह आरोग्य विभागाने किचन कट्टा या घटकात विद्यार्थ्यांना खमंग नानकटाई बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
गृह आरोग्य विभागाच्या निदेशिका अश्विनी राणे यांनी किचन कट्टा घटकात मुलांना खमंग नानकटाई कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि मुलांकडून नानकटाई बनवून घेतली. हा अभ्यासक्रम राबवत असताना प्रशालेतील मुलींबरोबरच मुलेही आवडीने सहभागी होतात. यामध्ये केक, शेंगदाणा लाडू, चिक्की, राजगिरा लाडू, सॅलेड, सॅण्डवीच, खजूर चटणी, टॉमेटो सॉस, तिळगुळ असे विविध पदार्थ शिकविले जातात. त्यामुळे किचन कसे सांभाळावे, साहित्य कसे हाताळावे, तसेच छोट्या-छोट्या टिप्सही मुलांना सांगितल्या जातात. तयार झालेल्या मालाचा खर्च व त्याचा विक्री दर कसा ठरवावा हे ही मुलांना शिकविले जाते. यासाठी संस्थाध्यक्ष एस. आर. गोखले, चेअरमन के. पी. गोखले, पदाधिकारी यांचे मार्गदर्शनही महत्वपूर्ण ठरते. मुलांना एस. आर. कोकरे, मुख्याध्यापिका श्रीमती हरचकर, सहाय्यक शिक्षिका सौ. हळदणकर यांचे मोलाचे सहकार्य मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT