कोकण

संगमेश्वर-उक्षी घाटात पुन्हा ट्रक अडकला

CD

07273


उक्षी घाटात पुन्हा ट्रक अडकला
वाहतूक ठप्प ; वळणाचा अंदाज न आल्याने फसला
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ः गुगल मॅपद्वारे शॉर्टकट वापरून उक्षी घाटातून प्रवास करताना सोमवारी (ता. २६) पहाटे कोळसा भरलेला ट्रक अडकला. त्यामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक खोळंबली. १९ ऑगस्टलाही अशाचप्रकारे एक ट्रक सायंकाळच्या सुमारास फसला होता. सविस्तर वृत्त असे की, ३० टन कोळसा भरलेला ट्रक उक्षी घाटमार्गे खाली उतरत असताना एका अवघड वळणावर ड्रायव्हरला वळणाचा अंदाज न आल्याने तो फसला. ही घटना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबली होती.
अपघात होऊ नये यासाठी ड्रायव्हर आणि क्लिनरने दोन्ही बाजूला वाहने थांबवली; मात्र सकाळी ही घटना उक्षी येथील ग्रामस्थांना कळल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकचालकाला मार्गदर्शन करून हा ट्रक सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला. या मार्गावर आतापर्यंत अशा प्रकारच्या पाच घटना घडल्या आहेत. ग्रामस्थांनी सांगूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT