मुलीची छेड काढणाऱ्याला चोप
चिपळूण, ता. २७ : जिल्ह्यातील एका शाळेतील मुलीचा पाठलाग करणाऱ्या एका तरुणाला शहरातील नागरिकांनी धरून चोप दिला. सोमवारी (ता.२६) सायंकाळी ही घटना घडली; मात्र त्याची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक शाळा सुटल्यानंतर शाळेतील मुले रस्त्याने घरी जात असताना एका परप्रांतीय तरुणाने आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा पाठलाग करण्यास सुरवात केली. संबंधित मुलगी रस्त्याने पुढे जात असताना तो तरुण मागून पाठलाग करत होता. मागील तीन दिवसापासून हा प्रकार सुरू होता. सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे ती मुलगी घराकडे जात असताना त्या परप्रांतीय कामगाराने तिचा हात धरला. ही बाब संबंधित मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने परिसरातील नागरिकांना सांगितली. तेथे जमलेल्या नागरिकांनी त्या कामगाराला चोप दिला नंतर त्याला सोडून दिले. शहर परिसरात इमारत बांधण्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी हा कामगार काम करत असताना सायंकाळी त्याने हा प्रकार केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन समज दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.