कोकण

खेडमध्ये ४५० हून अधिक दहीहंड्या

CD

07460

खेडमध्ये ४५० हून अधिक दहीहंड्या
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २७ : खेडमध्ये दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. पावसाच्या रिमझिम सरीत बालगोपाळांनी दहीहंडी फोडण्यासाठी शहरातील चौकाचौकात गर्दी केलेली दिसून आली. खेड येथील तीनबत्ती नाका, भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकूल, शिवाजीचौक या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी खेड शहरासह विविध ग्रामीण भागातील अनेक गोविंदा पथकांनी गर्दी केली. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (शिंदे गट) यांचा दहीहंडी उत्सव हा लक्षवेधी ठरला.
बाळगोपाळांसह प्रेक्षक वर्गासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा ठेवल्या होत्या. दहीहंडी उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. दहीहंडीनिमित्ताने खेडमध्ये राजकीय पक्षांची रस्सीखेच पाहायला मिळाली. शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी ४५० हून अधिक दहीहंड्या फुटल्या. यामध्ये १२ सार्वजनिक दहीहंड्यांचा समावेश आहे. १५हून अधिक गोविंदा पथकांनी सलामी देऊन हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. शहरात मनसे, शिवसेना, उबाठा, भाजपकडून लाखोंच्या दहीहंड्या उभारल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT