कोकण

पुतळा दुर्घटनेनंतर विरोधकांचे घाणेरडं राजकारण ः राणे

CD

07471

पुतळा दुर्घटनेनंतर विरोधकांचे
घाणेरडं राजकारण ः राणे

प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई हवी

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२७ : राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा कोसळल्‍यानंतर विरोधक मंडळी घाणेरडं राजकारण करत आहेत. भाजप सरकारला टार्गेट करत आहेत. पुतळा कोसळावा, अशी कुणाचीच इच्छा नव्हती. पुतळा उभारणीमध्ये सर्वांनीच शंभर टक्‍के योगदान दिले होते. पण, या घटनेचं राजकारण करून विरोधक विनाकारण सरकारला घेरण्याचा प्रयत्‍न करत आहेत, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज केली.
येथील ओम गणेश निवासस्थानी श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, ‘‘पुतळा कोसळणे ही घटना राजकीय नाही. प्रत्‍येक माणसाला या घटनेमुळे तीव्र दु:ख झाले आहे. पुतळा उभाारणीसाठी पालकमंत्र्यांसह सर्वांनीच प्रामाणिकपणे योगदान दिले आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशीही मागणी पालकमंत्र्यांसह आम्‍ही सर्वांनी केली आहे. कुणालाही याप्रकरणी पाठीशी घातलं जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. परंतु, राज्‍यभरातील विरोधी पक्षाची नेतेमंडळी मालवणात येऊन सरकारवर टीका करत आहेत. या मुद्यावर घाणेरडं राजकारण करत आहेत हे चुकीचं आहे.’’
राणे म्‍हणाले, ‘‘आज सतेज पाटील यांनीही मालवणात येऊन टीका केली. पण, विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत ते काही बोलले नाहीत. गडकिल्‍ल्‍यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबाबत त्‍यांची काय भूमिका आहे? हे आधी त्‍यांनी स्पष्‍ट करावं. आज कणकवली शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दुग्‍धाभिषेक केला. पण, हाच पुतळा महामार्गाच्या मध्यभागी होता. कधीही अपघातग्रस्त होण्याची शक्‍यता होती. त्‍यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्याची फिकीर नव्हती. आमची सत्ता आल्‍यानंतर हा पुतळा आम्‍ही महामार्गाच्या बाजूला हलवला. त्‍यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे शिवरायांवरील प्रेम कुठे गेले होते?’’ असा प्रश्‍न राणे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT