कोकण

मोटार- दुचाकी अपघातात बावशी येथील तरूण ठार

CD

मोटार- दुचाकी अपघातात
बावशी येथील तरूण ठार

वाघेरी फाटा येथील घटना, महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२७ : देवगड-निपाणी रस्त्यावरील वाघेरी फाटा येथे मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरूण ठार झाला. संदीप गणपत तांबे (वय ४०), असे मृताचे नाव आहे. तर संदीप यांची पत्‍नी जखमी झाली. ही घटना मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली.
याबाबत बावशी शेळीचीवाडी येथील नारायण बापू मांडवकर (वय ५९) यांनी आज पोलिसांत फिर्याद दिली. बावशी शेळीचीवाडी येथील संदीप तांबे आणि त्‍यांची पत्‍नी आरती या दुचाकीने (एमएच ०७ एन ०६१५) फोंडाघाट ते बावशी येत होते. फोंडाघाट-निपाणी रस्त्यावर वाघेरी फाटा येथे त्‍यांच्या दुचाकीला अज्ञात मोटारीची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील संदीप आणि आरती रस्त्याकडेला फेकले गेले. अपघातानंतर या घटनेची माहिती आरती तांबे यांनी बावशी येथील नारायण बापू मांडवकर यांना दिली. त्‍यांनी तातडीने वाघेरी फाटा येथे धाव घेतली. त्‍यानंतर जखमींना खासगी रूग्‍णवाहिकेतून कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. यावेळी संदीप यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. तर जखमी आरती यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT