कोकण

कुडाळात ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष

CD

07507
07508

कुडाळात ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष

दहीहंडी उत्सव ः गोविंदा पथकांनी रचले थरावर थर

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः तालुक्यासह शहरात मंगळवारी ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’च्या नामघोषात डीजेच्या तालावर, विविधांगी नृत्याविष्कारात दहीहंडी सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. गोविंदा पथकांनी रचलेले थरावर थर हे या सोहळ्याचे खास आकर्षण बनले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेतर्फे आमदार वैभव नाईक पुरस्कृत एक लाखाची निष्ठेची दहीहंडी येथील जिजामाता चौक येथे बांधण्यात आली. याचा प्रारंभ सहसंपर्कप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, यतीन खोत, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, सचिन काळप, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, सई काळप, ज्योती जळवी, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, गुरू गडकर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, दीपक सावंत, आंबडपाल उपसरपंच गोट्या चव्हाण, स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते. वाफोली येथील गोविंदा पथकाने सलामी दिली. द रॉकरर्स बॉलीवूड बँडचा आर्केट्रा तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. गणेशवंदना कार्यक्रमासह लक्ष्मीनारायण महिला ढोल पथकाने (आवळेगाव) कला सादर केली.
२५० हून अधिक सदस्य असणाऱ्या हेल्प ग्रुपची दहीहंडी लक्ष्मी नक्षत्र टॉवरसमोर उभारली होती. शहरासह ग्रामीण भागातही दहीहंडींचा सोहळा दिमाखात झाला. हेल्प ग्रुपच्या दहीहंडीचा प्रारंभ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते झाला. डॉ. संदीप पाटील, संजय कदम, विवेक पंडित, बंड्या सावंत, संजय कोरगावकर, मनोज वालावलकर, संग्राम सावंत, जीवन बांदेकर, बंटी तुळसकर, धीरज पांचाळ, मनोज सावंत, जय नेरुरकर, विलास भोसले, दीपक रांजणकर, जयंत नेरुरकर, जयदीप तुळसकर, प्रकाश गोरख, धनंजय पाताडे, राम राऊळ, गणेश गोखरे, रोशन सावंत, नागेश नार्वेकर, गुरुदास यादव, दीपक गोंधळी, प्रकाश गोंधळी, गौरव जाधव, अभी परब, सचिन कोंडस्कर, बादल चौधरी ग्रुपचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. पिंगुळी व अन्य ठिकाणी दहीहंडी होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हे बिल दलित आणि मागासवर्गीय लोकांच्या हिताचे नाही - राहुल गांधी

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"

Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...

Walmik Karad Video: अजूनही पायात चप्पल नाही... वर्षभरानंतर वाल्मिक कराडचा व्हिडीओ आला; प्रकृती बिघडली

'स्वामींची कृपा असेल की, मी तिला...' थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदे जत्रा सिनेमाचा प्रसंग सांगताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT