07511
संदीप गावडेंचे कार्यक्रम वैविध्यपूर्ण
प्रभाकर सावंत ः सावंतवाडीतील दहीहंडी उत्सवाचे दिमाखात उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः संदीप गावडे यांनी आयोजित केलेला प्रत्येक कार्यक्रम हा देखणा व वैविध्यपूर्ण असतो. या सर्व सोहळ्यांमध्ये भाजप पक्षाचा शतप्रतिशतपणा ओथंबून दिसतो. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच भाजपच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची गावडे यांना नेहमीच साथ लाभली आहे. स्थानिक पातळीवरील मुलभुत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते नेहमी करत आले आहेत. या माध्यमातून या मतदारसंघातील भाजपचे युवा नेतृत्व म्हणून ते विकसित होत आहेत. हा सोहळा यापुढेही दरवर्षी अधिकाधिक रंगतदार व भव्य होत जाईल यात शंका नाही. या सर्व कार्यात भाजप पक्ष त्यांच्या नियमित सोबत राहील, अशी ग्वाही भाजपचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या पटांगणावर भाजप नेते संदीप गावडे मित्र मंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, प्रमोद सावंत, माजी नगरसेवक मनोज नाईक, भाजप नेते संदीप गावडे, एकनाथ गावडे, संदीप यांच्या मातोश्री सौ. सुनिता गावडे, सौरभ गावडे, चंदन धुरी, जितेंद्र गांवकर, बंटी पुरोहित, गेळे सरपंच सागर ढोकरे, उमेश पेडणेकर, देवसू सरपंच रुपेश सावंत, म. ल. देसाई, दीनानाथ कशाळीकर, एकनाथ परब, अनिकेत आसोलकर, अशोक परब, माडखोल माजी सरपंच बाळू शिरसाट, भाऊ कोळंबेकर, प्रकाश दळवी आदी उपस्थित होते.
माजी आमदार तेली यांच्या हस्ते दहीहंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संदीप गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. वेतोरे येथील सिंधुरत्न ढोलपथकाने बहारदार वादनाने कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी ‘मुलगी झाली हो’ व ‘धागा धागा जोडते नवा’ फेम दिव्या फुगावकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात रंगत आली. ढोल ताशांच्या गजरात तिने प्रेक्षकांमधून धमाल एन्ट्री घेत व ‘नमस्कार सावंतवाडीकर’ अशा शब्दांत हाक देत चाहत्यांना अभिवादन केले. विशेष म्हणजे तिने मालवणीतून संवाद साधत कार्यक्रमात वेगळा उत्साह आणला. मी देखील कोकणातीलच असून कोकणात आल्याचा वेगळा आनंद आहे, असे ती म्हणाली.
--
रात्री उशिरापर्यंत दहीहंडींचा थरार
मुख्य कार्यक्रमात रंगत आणली ती विविध दहीहंडी मंडळांच्या उपस्थितीने. सावंतवाडी शहरासह तालुक्यातील दहीहंडी मंडळांनी यावेळी उपस्थित राहत थरांवर थर रचत सलामी दिली. यावेळी उपस्थित दहिहंडी प्रेमींनी टाळ्यांच्या गजरात उपस्थित गोविंदांना प्रोत्साहित केले. दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी बेस्ट इन्स्टा स्टोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षक आपल्या मोबाईलमध्ये दहीहंडी फोडणाऱ्या पथकांचे फोटो टिपण्यात दंग होते. रात्री उशिरापर्यंत या दहीहंडी महोत्सवाचा थरार सुरु होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.