- rat२८p१२.jpg-
२४N०७५६६
लांजा ः तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत यशस्वी झालेले एकनाथ राणे हायस्कूलचे विद्यार्थी.
तायक्वांदोत राणे स्कूलला ३५ पदके
तालुकास्तर स्पर्धा ; १४ खेळाडूंची जिल्हा स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३० ः लांजा तालुका शालेय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यामंदिर व (कै.) एकनाथ राणे इंग्लिश मीडियम स्कूलने ३५ पदके मिळवली. त्यात १४ सुवर्ण, १४ रौप्य व सात ब्राँझ पदकांचा समावेश आहे.
लांजा तालुका शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा ज्ञानेश्वर विद्यामंदिर शाळेत पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, संस्थेचे खजिनदार जयवंत शेट्ये, मुख्याध्यापिका अनुराधा राणे, संचालक कौस्तुभ राणे, लांजा तालुका तायक्वांदो संघटना अध्यक्ष किशोर यादव व सर्व क्रीडाशिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यामंदिर व (कै.) एकनाथ राणे हायस्कूल लांजा प्रशालेने तब्बल ३५ पदके मिळवली. त्यामध्ये १४ सुवर्ण, १४ रौप्य व सात कास्य पदकांचा समावेश आहे. १४ मुलांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यात १४ वर्षांखालील गटात तेजस्वी लाड, गुडिया कुमारी शहा, कौस्तुभ कदम, तनिष लांजेकर, अर्णव गुरव, दक्षण यादव, विराज जाधव, सोहम सुर्वे तर १७ वर्षांखालील गटात श्रेया कांबळे, पायल जोशी, अशरीन नाईक, सुमित्रा राठोड, अहमदरज्जा मापारी, महमंद जैद मुकरी या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक तेजस्विनी आचरेकर, तेजस पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा राणे, प्रिया भागवत, क्रीडाशिक्षक सुशील वासुरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
--------
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.