rat२९p२५.jpg-
P२४N०७८२७
राजापूर ः शाळेच्या भिंतीवर रंगवण्यात आलेले चांद्रयान.
rat२९p२६.jpg-
P२४N०७८२८
आकर्षक रंगवण्यात आलेल्या शाळेच्या भिंती.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला मिळाली चालना
मुख्यमंत्री माझी शाळा अभियान ; लवकरच होणार पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील शाळांचे मुल्यमापन सुरू झाले आहे. यंदा तालुकास्तरीय पुरस्काराचा मान कोणत्या शाळेला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. आंबेडकर आदर्श शाळा हे स्पर्धात्मक अभियान २०२३-२४ मध्ये राज्यातील सर्व शाळांसाठी राबवण्यात आले होते. या अभियानाला विद्यार्थी, पालकांनी प्रतिसाद दिला. या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रक्कमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली. हे महत्वाकांक्षी अभियान यंदाही राबवण्यात येत आहे. यामध्ये मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवताना भौतिक सुविधांची उभारणी अपेक्षित आहे. या शाळांची पंचायत समितीच्या मुल्यमापन समितीकडून तपासणी केली असून, त्या माध्यमातून लवकरच तालुकास्तरीय पुरस्काराची निवड केली जाणार आहे.
------
असे होते मुल्यांकन
पहिल्या टप्प्यातील अभियानाच्या यशस्वीतेमुळे यंदा २०२४-२५ मध्येही मुख्यमंत्री मझी शाळा-सुंदर शाळा टप्पा २ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधांसाठी ३३ गुण, शासन ध्येयधोरण अंमलबजावणीसाठी ७४ गुण व शैक्षणिक संपादणूकसाठी ४३ असे एकूण १५० गुण देण्यात येतात.
------
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.