कोकण

-सावर्डेकर, रायकर, टीपुगडे, मांगले विविध गटात विजयी

CD

rat२९p२९.jpg-
२४N०७८५९
चिपळूण : लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलक्सीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते.

सावर्डेकर, रायकर, टीपुगडे, मांगले विजयी

बुद्धिबळ स्पर्धा; लायन्सतर्फे आयोजन, १९८ खेळाडूंचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलक्सीतर्फे बांदल हायस्कूल येथे आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चिपळूणच्या ओंकार सावर्डेकरने अपराजित राहून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ओंकार, चिपळूणचा प्रवीण सावर्डेकर आणि रत्नागिरीच्या अवधूत पटवर्धन यांच्यामध्ये समान गुण झाल्याने टाय ब्रेकर आधारे निकाल जाहीर करण्यात आला.
लायन्सचे अनिल देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे तसेच आकर्षक चषक व मेडल्स देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचे उद्‍घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पटावर चाल करून करण्यात आले. निकम यांनी खेळाडूंशी संवाद साधताना बुद्धिबळ खेळाचा आपल्या दैनंदिन जीवनात होणारा उपयोग या विषयी अमूल्य मार्गदर्शन केले. स्पर्धाप्रमुख डॉ. शमीना परकार, अक्षदा रेळेकर, डॉ. सविता दाभाडे, स्वाती देवळेकर, पद्मा ओली आणि चेतना होमकर उपस्थित होत्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चिपळूणचे आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळपटू व प्रशिक्षक प्रवीण सावर्डेकर, प्रशिक्षिका रश्मी सावर्डेकर, ओंकार सावर्डेकर यांनी विशेष परिश्रम घेतले व शालेय गटात साहाय्यक पंच म्हणूनही काम पाहिले. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच व राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक विवेक सोहनी यांनी काम पाहिले.
स्पर्धा खुलागट, महिला गट, पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा चार गटांमध्ये खेळण्यात आली. साखळी पद्धतीने खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत सर्व गटांमध्ये सहा फेऱ्या घेण्यात आल्या. अवघ्या दहा वर्षाच्या विहंग सावंत याने तसेच बारा वर्षाच्या आयुष रायकर याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पहिली ते सातवीच्या गटामध्ये विजेतेपद, उपविजेतेपद पटकावत कौतुकाची थाप मिळवली. सई प्रभूदेसाई, निधी मुळ्ये, रमा कानविंदे आणि सानवी दामले यांनी महिला गट सोडून तुलनेने अधिक कठीण असलेल्या खुल्या गटात खेळत आपला कस पणाला लावून उत्कृष्ट कामगिरी केली.
-----
चौकट १

सविस्तर निकाल असा

खुला गट- ओंकार सावर्डेकर, प्रवीण सावर्डेकर, तिसरा ते दहावा क्रमांक : अवधूत पटवर्धन, तनिश शिरगावकर, साहस नारकर, विशाल आंबेकर, किरण ओली, श्रीहास नारकर, मिलिंद नरवणकर, वेद कडू. महिला गट- सुमेधा मांगले, पद्मश्री वैद्य, तिसरा ते दहावा क्रमांक : अर्णवी सावंत, धर्मी पटेल, निधी मालू, तनुष्का दांडेकर, खुशबू विश्वकर्मा, आर्या गांधी, अस्मी गांधी, अनुष्का विश्वकर्मा. पहिली ते सातवी गट- आयुष रायकर, विहंग सावंत, तिसरा ते दहावा क्रमांक : राघव पाध्ये, सानवी दामले, सारंग दांडेकर, विपुल फडके, सोहम अभ्यंकर, झायान चौगले, श्री कांबळे, रमा कानविंदे. आठवी ते दहावी-चिन्मय टिपुगडे, आर्यन धुळप, तिसरा ते दहावा क्रमांक : अर्णव चव्हाण, सर्वेश दामले, सुतेज बेर्डे, विपिन सावंत, ओम कुलकर्णी, हर्षवर्धन भिंगे, साकेत पाटणकर, लवेश पावसकर.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT