- rat३p७.jpg -
P२४N०८०५१
चिपळूण ः आमदार शेखर निकम यांचा सत्कार करताना फेडरेशनचे प्रमुख सचिन कोल्हापुरे, शशिकांत मोदी, संदीप लवेकर, राजेंद्र घाग आणि मान्यवर.
स्वयंरोजगार संस्थांना विनानिविदा कामे
सचिन कोल्हापुरे ः ३ लाखांची मर्यादा १० लाखांवर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० : शासनाने स्वयंरोजगार व बेरोजगार संस्थांना विनानिविदा कामे मिळण्याची ३ लाखांची मर्यादा १० लाखांपर्यंत नेली आहे. शासनाच्या या निर्णयासाठी पालकमंत्री उदय सामंत व आमदार शेखर निकम यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे महाराष्ट्रातील संस्थांना वस्तूपुरवठा, वार्षिक देखभाल कामे, मनुष्यबळ पुरवठा व वाहनपुरवठा ही कामे विनानिविदा मिळण्याचा मार्ग सूकर झाला, अशी माहिती स्वयंरोजगार, बेरोजगार फेडरेशनचे प्रमुख सचिन कोल्हापुरे यांनी दिली.
सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या संपर्क कार्यालयात ते बोलत होते. या वेळी स्वयंरोजगार संस्था व बेरोजगार संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात दोन हजारांहून अधिक बेरोजगार संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना आता विनानिविदा प्रक्रिया राबवून १० लाखांपर्यंत कामे मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या आधी कामाची मर्यादा ३ लाखांपर्यंत होती. या कामी फेडरेशनकडून मागील सहा महिने प्रयत्न सुरू होते, असे कोल्हापुरे यांनी सांगितले.
सावर्डे येथील कार्यक्रमावेळी फेडरेशनचे प्रमुख सचिन कोल्हापूर, शशिकांत मोदी, संदीप लवेकर, राजेंद्र घाग, मंगेश बांडागळे, ज्ञानेश्वर घाग, शशांक जाधव, हर्षद कदम, अक्षता सावंत, राकेश घाग, ओंकार रेळेकर, देवराज गरगटे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.