08096
राजकोट दुर्घटनेतील
दोषींवर कारवाई करा
अजित पवार गट ः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीत अनेक त्रुटी राहिल्याचे सत्ताधाऱ्यांनी मान्य केले असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. या दुर्घटनेत जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, सावळाराम आणावकर, प्रज्ञा परब, सुरेश सावंत, विनायक गावकर, संदीप पेडणेकर, सुशील चीमणकर, संतोष राऊळ आदी उपस्थित होते. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारण्यात येत नाही. केवळ आठ महिन्यात पुतळा पडणे ही बाब अनाकलनीय आहे. तरी या शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये जे-जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरुन असे निकृष्ट काम करण्याची हिंमत कोणाला होणार नाही. पुढील काळात राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवजी महाराज यांची प्रतिमा व दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक शक्तिशाली पुतळ्याच्या रुपात उभारण्यात यावे, अशी मागणी या निवेदनामार्फत केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.