कोकण

शिरगाव - शिवरेवाडी रस्ता दुरुस्तीची मागणी

CD

-rat३०p९.jpg-
२४N०८०५३
रत्नागिरी : शिरगाव शिवरेवाडी रस्त्याची दयनीय अवस्था.
--------------
शिरगाव-शिवरेवाडी रस्ता दुरुस्तीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे; मात्र शहराजवळील शिरगाव-शिवरेवाडी येथील रस्त्याची डागडुजी केलेली नाही, ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थ तन्मय दाते यांनी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सरपंच यांच्यावतीने ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके यांनी हे निवेदन स्वीकारले. दाते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी शिरगाव ग्रामस्थ असून शिवरेवाडी येथील प्रमुख रहदारीचा रस्ता गेले सहा ते सात महिने दुरवस्थेत आहे, रस्त्याला खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेनासे झाले आहे.
आगामी गणेशोत्सव हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लवकरात लवकर रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी केली. शिरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी यांनी या निवेदनाची दखल घेतली आहे. गणपतीपूर्वी रस्ता खड्डेमुक्त करणार आहे तसेच डिसेंबरपर्यंत संपूर्ण रस्त्यावर चांगल्या दर्जाचे डांबरीकरण केले जाईल, अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT