कोकण

पुतळा कोसळल्याचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

CD

०८१४८

पुतळा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
खासदार संजय राऊत : ‘ठाणे कनेक्शन’मुळेच जयदीप आपटेला कंत्राट
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : राजकोट येथील पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने जनतेची माफी मागितली असली तरी त्याने असे प्रश्न सुटत नाहीत. हे प्रकरण सरकारच्या गळ्याशी आले आहे. सरकार पूर्णपणे या प्रकरणात अडकले असून त्यांना बाहेर तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असून यामागे ठाणे कनेक्शन असल्याचा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी राजकोट येथे जात महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. पाहणीनंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली.
यावेळी श्री. राऊत म्हणाले, ‘दुर्दैवाने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा असा पुतळा पहावा लागला. पानशेत व लातूरच्या दुर्घटनेनंतर एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या जनतेने पाहिला. या घटनेनंतर महाराष्ट्रातून जर पहिली प्रतिक्रिया कोणी दिली असेल ती आमदार वैभव नाईक यांनी. त्यांनी हातात काठी घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय फोडले ही त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. परवा याच घटनेवरून मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे ‘जोडे मारो’ आंदोलन होत आहे. सरकारची हीच लायकी आहे. राज्य सरकार आर्थिक व्यवहारात गुंतलेले आहे. ज्यांच्या नावाने राज्य करता त्या महाराजांनाही त्यांनी सोडले नाही. मुख्यमंत्र्यांसह अधिकारीही खोटे बोलत आहेत. पुतळा वाऱ्‍याने पडला हे मुख्यमंत्र्यांचे विधान आहे. प्रत्यक्षात येथे नारळ पोफळीची झाडे आहेत. त्यातील एकही झाड कोसळले नाही; मात्र हे सरकार पुतळा कोसळण्याचे खापर भारतीय नौदलावर फोडून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत आहे.’’
ते म्हणाले, ‘‘नौदलाने हिमालयावर वीर पुरुषांचे, योद्ध्यांचे पुतळे साकारले आहेत. समुद्रात नौदलाच्या लोखंडी युद्धनौका कधी गंजल्या नाहीत. असे असताना या सरकारमधील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना जनाची आणि मनाचीही राहिली नाही. लहान मूर्ती साकारणाऱ्या आणि कोणताही अनुभव नसलेल्या आपटे याला पुतळा बनवण्याची सुपारी देणारा ठाण्यात बसला आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट यांनी हा पुतळा बेकायदेशीर असल्याचे अगोदरच जाहीर केले आहे तर सांस्कृतिक कला संचलनालयाची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. हा पुतळा साकारण्यासाठी आपटे अचानक कसा उपटला हे तपासावे लागेल. यामागे ‘ठाणे कनेक्शन’ आहे. हा सूत्रधार कोण आहे याचा अगोदर खुलासा व्हायला हवा. पुतळा दुर्घटनेत गुन्हा दाखल असलेल्या संबंधितांना तत्काळ जामीन मिळावा यासाठी ठाणे येथून फिल्डिंग लागली असल्याची माहिती मला मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्‍या पुतळ्याला तुमचे पापी हात लागू नयेत कारण पुढील अडीच महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होत असून आम्ही या ठिकाणी मोठ्या दिमाखात महाराजांचा पुतळा उभारू.’’
श्री. राऊत म्हणाले, ‘‘सरकारने पुतळा दुर्घटनेनंतर जनतेची माफी मागितली आहे. परंतु माफी मागून असे प्रश्न सुटत नाहीत. हे प्रकरण आले आहे. सरकार पूर्णपणे या प्रकरणात अडकले असून सरकारला बाहेर तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही. यासाठी त्यांना महाराष्ट्रा समोर १०० वेळा नाक रगडावे लागेल. इतके करून जनता तुमची माफी स्वीकारायला तरी पाहिजे. मंत्रालयात हल्ली अनेक बैठका होत असून कोणते काम कोणाला द्यावे यासाठी त्या होत आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजही सुटले नाहीत हे राज्याचे दुर्दैव आहे.’’
या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, अतुल रावराणे, सतीश सावंत, बाळा गावडे, जान्हवी सावंत, हरी खोबरेकर, बाबी जोगी, मंदार केणी यांच्यासह उबाठा शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
फडणवीसांना गृहमंत्रिपदी
राहण्याचा अधिकार नाही
राज्याला गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या डोळ्यासमोर या ठिकाणी भाजपच्या नेत्यांकडून धमक्या दिल्या जात होत्या. पत्रकारांवर हल्ला झाल्याच्या ही घटना घडल्या. पोलिस आणि पक्षांच्या गुंडांना रस्त्यात उभे करून आमचा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न झाला. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून पदावर राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राने त्यांच्यासारखा दुबळा गृहमंत्री आजपर्यंत पाहिला नाही, अशी टीकाही श्री. राऊत यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: मीराबाई चानूची स्वप्नपूर्ती! आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले पहिले पदक; २८ वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला...

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT