कोकण

फिनिक्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्पर्धेला प्रतिसाद

CD

-rat३०p२२.jpg-
२४N०८०८७
रत्नागिरी : फिनिक्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस देताना प्रा. श्रीकांत दुदगीकर. सोबत डॉ. मकरंद साखळकर, डॉ. पी. पी. कुलकर्णी, डॉ. अपर्णा कुलकर्णी आदी.
---------------
यश पकये, आयुष बारगोडे प्रथम

‘फिनिक्स सॉफ्टवेअर’ स्पर्धा ; गोगटे महाविद्यालयात आयोजन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : गोगेट-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) संगणक शास्त्र विभागाच्यावतीने राधाबाई शेट्ये सभागृहात फिनिक्स २०२४ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्पर्धा झाली. यात व्हिडिओ फिनिक्स स्पर्धेत प्रथम यश पकये, आयुष बारगोडे, द्वितीय कीर्ती कुवळेकर, मेघना गुरव, तृतीय क्र. भूमी चिपळूणकर व रोशनी राडये यांनी मिळवला. वेब फिनिक्स स्पर्धेत आर्य रिसबूड, तन्वी शिंदे, तन्वी सुतार, माहिरा तांडेल व अलीना वस्ता यांनी यश मिळवले. अॅप फिनिक्स स्पर्धेत अफशा खान, हृतिक दुबे, मुस्कान बंदरी यांना यश मिळाले. शोध फिनिक्स स्पर्धेत सिद्धेश सुर्वे, काईनाथ फोडकर, साईम वाडकर, शोध लेखक स्पर्धेत काईनाथ फोडकर, सिद्धेश सुर्वे आणि दिव्येश साळवी यांनी यश मिळवले.
संगणक विज्ञान विभागाने या संधीचा उपयोग विभागाच्या संशोधन पत्रिकेचे प्रकाशन करण्यासाठी केला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधन प्रबंधांचा संग्रह आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण संगणक शास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी आणि बॉलिवूड, हॉलिवूड जाहिरात उद्योगातील नामांकित निखिलेश नारकर यांनी केले.
पुरस्कार वितरण समारंभात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र विभाग समन्वयक प्रा. अनुजा घरपुरे, आयटी विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी हे मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT