-rat३०p२५.jpg-
२४N०८११२
रत्नागिरी ः महिला सुरक्षेबाबत शिर्के प्रशालेत लायन्स क्लबतर्फे पत्रके वाटण्यात आली.
-------
महिला सुरक्षिततेसाठी जनजागृती मोहीम
लायन्स क्लबचा पुढाकार; शिर्के प्रशालेतून प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३० ः लायन्स क्लब रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा पोलिसदलामार्फत महिला सुरक्षा जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबत माहिती देणारी पत्रके लायन्स क्लबने विद्यार्थ्यांना वितरित केली. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे अशी जनजागृती जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये जाऊन करण्याचा मानस आहे.
लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे शिर्के प्रशालेत विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांसाठी गुड टच आणि बॅड टच याबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिसदलातर्फे गायत्री पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिर्के प्रशालेतील ४००पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला. सध्या समाजात घडत असलेल्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर लायन्स क्लबतर्फे विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. एस. आर. के ॲकॅडमीमार्फत शालेय मुलींना संकटकाळात स्वतःचा बचाव कसा करायचा याबद्दल तायक्वांदोचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी लायन्स क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष गणेश धुरी, सचिव विशाल ढोकळे, संजय पटवर्धन, उदय आपटे, साक्षी धुरी, प्राची शिंदे, शबाना वस्ता, श्रेया केळकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.