कोकण

रत्नागिरी- फसवणूक टाळण्यासाठी जागरूक राहा

CD

08109

फसवणूक टाळण्यासाठी
जागरूक राहाः गाडगीळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : डिजिटल पेमेंट, मेसेजवरून आलेली लिंक, अनोळखी नंबरवरून आलेला फोन अशा अनेक कारणांनी फसवणुकीचे प्रमाण वाढले आहेत. भितीपोटी किंवा पैसै मिळणार आहेत म्हणून अनेक लोक या फसव्या लिंकला क्लिक करून फसतात; परंतु हे टाळण्याकरिता सदैव जागरूक राहा, असे आवाहन सीए मंदार गाडगीळ यांनी केले.
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आर्थिक साक्षरता कार्यक्रमात बोलत होते. श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते म्हणाले, सर्व गोष्टींकडे बारकाईने पाहिले पाहिजे. काय केले तर काय होऊ शकते, याची माहिती घेतली पाहिजे. अनेकदा मोबाईलवर ओटीपी पाठवून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. आपला बीएसएनएल कंपनीचा नंबर बंद पडणार आहे, शेअर मार्केटच्या नावाखाली तसेच पैसे दुप्पट करून देतो अशा विविध माध्यमातून फसवणूक केली जाते.
ऑनलाईन पेमेंट करतानासुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपला पासवर्ड कोणालाही सांगू नये. एटीएममधून पैसे काढताना काळजी घ्यावी. सायबर सिक्युरिटीची माहितीसुद्धा घेणे आवश्यक आहे. अनेकदा चांगले शिकलेली व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकसुद्धा भितीपोटी माहिती देतात व फसवणूक होते. आपण सजग राहूनच आर्थिक व्यवहार केले पाहिजेत. कार्यक्रमाला अभिलाषा मुळ्ये, शैलेश हळबे, केदार करंबेळकर, अक्षय जोशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT