rat३०p२७.jpg-
OP२४N०८१५२
रत्नागिरी : काणे संस्कृत अध्ययन केंद्रात योग प्रमाणपत्र कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सोबत जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, डॉ. दिनकर मराठे, प्रशिक्षक आदी.
-----------
निरोगी जीवनासाठी योग आवश्यक
सत्यविनायक मुळे ः नि:शुल्क योग कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : भारतीय परंपरेतील एक अमूल्यशास्त्र म्हणून योगशास्त्राकडे पाहिले जाते. योगामुळे केवळ शरीरच नव्हे तर मनाचीदेखील शुद्धी होते. त्यामुळे धकाधकीच्या काळात आयुष्य जर टवटवीत ठेवायचे असेल तर योग आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात निःशुल्क योग प्रमाणपत्र कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. बीए आणि एमए योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.
या वेळी बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक नरेंद्र देवरे यांनी सुदृढ आरोग्याचा मंत्र देताना निरोगी जीवन साधायचे असेल तर निरंतर योग करणे हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले. कार्यशाळेत ४८ रत्नागिरीकरांनी सहभाग घेतला. कार्यशाळेचे संचालन योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी यांनी केले. या वेळी उपस्थितांना प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी उपकेंद्रातील प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी, स्वरूप काणे, अपर्णा कोकरे, निकिता अडखराव, करण कीर, प्रथमेश घोसाळे, कौशल जोशी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.