कोकण

विज तक्रारींचे वेळीच निराकरण करा

CD

08162

वीज तक्रारींचे वेळीच निराकरण करा

नीतेश राणे ः कामे गणेशोत्सावापूर्वी मार्घी लावण्याच्या देवगडात सूचना

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः तालुक्यातील वीजेसंबधित विविध समस्यांचे गाऱ्हाणे नागरिकांनी येथील बैठकीत मांडले. यावेळी अधिकाऱ्यांनी कामात सातत्य ठेवून तक्रारींचे वेळीच निराकरण करण्याचे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी केले. गणेशोत्सवापूर्वी तातडीची कामे मार्गी लावण्याची सुचनाही त्यांनी केली.
तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी आमदार राणे यांच्या उपस्थितीत येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी, उपकार्यकारी अभियंता राहुल लिमकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, बाळ खडपे, राजेंद्र शेटये, संदीप साटम, महेश उर्फ बंड्या नारकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विजेच्या समस्या मांडल्या. किल्ला भागातील विद्युत रोहित्र बदलण्याची मागणी केली. पाच दिवसांचा आठवडा असल्याने सोमवारी वीज खंडित होत असल्याने शासकीय कामे होत नाहीत. यासाठी देखभाल दुरूस्तीचा दिवस बदलण्याची मागणी केली. तालुक्यातील काही गावे आचरा उपकेंद्राला जोडल्याने त्या भागातील ग्राहकांना अडचणीचे ठरते. यासाठी आचरा विभागाला जोडलेली गावे तालुक्यातीलच विभागाला जोडण्याची मागणी करण्यात आली. मंजूर असलेल्या भुमिगत वीज वाहिन्यांची कामे वेळीच उरकण्याची मागणी करण्यात आली. नादुरूस्त वीज मिटरचा प्रश्‍न मांडून यामध्ये ग्राहकांना आर्थिक भार पडत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. यावर तालुक्यातील सुमारे ९ टक्के मीटर नादुरूस्त असून उपलब्धतेनुसार ते बदलले जात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. शिरगांव उपकेंद्राबाबतचा मुद्दा उपस्थित करून त्यासाठीच्या आवश्यक जागा उपलब्धतेबाबत चर्चा करण्यात आली. २०१५ मध्ये मागणी करूनही बापर्डे भागातील दोन लाभार्थ्यांना अद्याप शेती पंप जोडणी मिळाली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. बागतळवडे येथील विद्युत रोहित्र बसवण्याचा मुद्दा मांडण्यात आला. ग्रामपंचायतीच्या पथदीपाचा प्रश्‍न मांडण्यात आला. ग्रामपंचायतीना पूर्वीप्रमाणे पथदीप बील मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. येथील पवनचक्की प्रकल्पाला माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सभेला राजकीय नेतेमंडळी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच उपस्थित होते.
............
.....आणि हशा पिकला
देवगड जामसंडे शहराला वीजेची समस्या जाणवत असून वारंवार वीज जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. यावर आवश्यक उपाययोजना करून वीज समस्येची कारणे दूर करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याच दरम्यान सभागृहातील वीज पुरवठा खंडित झाल्याने आमदारांनी त्याकडे अंगुलीनिर्देश करताच हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

SCROLL FOR NEXT