- ratchl३०५.jpg
२४N०८१६७
ः चिपळूण - सावर्डे परिसरातील उपोषणाला बसलेले ग्रामस्थ
कापशी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी पाठपुरावा
जलदूत शाहनवाज शाह ः उपोषणकर्त्यांची घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः तालुक्यातील सावर्डे येथील कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्याविरोधात सावर्डे परिसरातील सात गावच्या ग्रामस्थांचे १५ ऑगस्टपासून येथील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. पंधरा दिवसानंतरही यावर तोडगा निघालेला नाही. या उपोषणाची जलदूत, वाशिष्ठी जगबुडी नदी समन्वयक शाहनवाज शाह यांनी दखल घेत शुक्रवारी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली तसेच कापशी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी आपणही शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
सावर्डे येथील कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे कापशी नदी प्रदूषित होत आहे. याचा फटका सावर्डेसह कोंडमळा, आगवे, दहिवली, ओमळी, ढोक्रवली, मांडकी गावांतील ग्रामस्थांना बसत आहे. या विरोधात येथील ग्रामस्थांनी दूषित पाण्याच्या प्रश्नावरून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने साखळी उपोषण सुरू केले त्यानंतर आजतागायत हे उपोषण सुरूच आहे. आतापर्यंत या उपोषणकर्त्यांची आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, रमेश कदम, प्रशांत यादव तसेच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतरही उपोषणावर कोणताही तोडगा निघाला नाही. ग्रामस्थांनी उपोषण यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. जोवर न्याय मिळत नाही तोवर उपोषण सुरूच राहील, असे या उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.
या उपोषणकर्त्यांची जलदूत वाशिष्ठी व जगबुडी नदी समन्वयक शाहनवाज शाह यांनी भेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.