कोकण

अवैध धंद्यांविरोधात महाविकास आक्रमक

CD

08192

अवैध धंद्यांविरोधात महाविकास आक्रमक

‘उत्पादन शुल्क’वर मोर्चा ः ः देवगडप्रश्नी वेधले प्रशासनाचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः तालुक्यात बोकाळलेली अवैध दारू आणि अंमली पदार्थ विक्रीविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली. अवैध व्यवसाय तातडीने बंद झाले पाहिजेत, या मागणीसाठी शहरातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत तरूण पिढीचे नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधले. या अनुषंगाने पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात आले.
तालुक्यात अवैध व्यवसाय बोकाळल्याने युवा पिढी व्यसनाधिनतेच्या मार्गावर आहे. याबाबत यंत्रणेला जाग आणण्यासाठी ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढला होता. महाविद्यालय नाका परिसरातून मोर्चाला प्रारंभ झाला. यामध्ये ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष विवेक ताह्मणकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सूरज घाडी, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, महिला आघाडीप्रमुख हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकर, तुषार भाबल, अ‍ॅड. प्रसाद करंदीकर आदी सहभागी झाले होते. तालुक्यात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू असून यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असून पिढी बरबाद होण्याची लक्षणे असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. युवासेनेतर्फे येथील पोलिसांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. मात्र, तरीही काहीही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. महाविद्यालय नाका परिसर येथून सुरू झालेला मोर्चा बाजारपेठमार्गे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाच्या विरोधात घाषणाबाजी करीत तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयासमोर ठिया आंदोलन करून संतप्त भावना नेत्यांनी व्यक्त केल्या. नंदकुमार घाटे, सुशांत नाईक, किरण टेंबुलकर, विवेक ताम्हणकर, अ‍ॅड. प्रसाद करंदीकर, गणेश गावकर आदींनी मोर्चाला संबोधित केले. पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक संतोष घावरे मोर्चाला सामोरे गेले. यावेळी महाविकास आघाडीतर्फे त्यांना निवेदन दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहायक दुय्यम निरीक्षक एस. एस. चौधरी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता.
..........
कोट
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या असून यातून अवैध व्यवसायाची तीव्रता लक्षात येते. अवैध व्यवसायातून कुटुंबे उद्ध्वस्त होत असून तरूण पिढी व्यसनाधिनतेच्या मार्गावर आहे. राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू आहेत. पोलिसांचा यावर अंकुश नाही. हे व्यवसाय बंद झाले नाहीत तर मोठे आंदोलन छेडू.
- सुशांत नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख, ठाकरे गट
.........................................
पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठरवले तर ते अवैध व्यवसाय तातडीने बंद करू शकतात. मात्र, व्यवसायाला राजकीय पाठबळ आहे का? यातून यंत्रणा बळी पडते का? अशी शंका आहे. पिढी बाद झाली तरी चालेल. पण, अवैध दारू विक्रीतून गोव्याचा विकास झाला पाहिजे असे धोरण आहे का?
- किरण टेंबुलकर, युवक जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
..............................................
स्थानिक आमदार नीतेश राणे यांनी अवैध व्यवसाय बंद करण्याविरोधात यापूर्वी आवाज उठवला होता. मात्र, त्यांच्याकडून काहीही झाले नसल्याने असा मोर्चा काढावा लागला. त्यांनी परिवर्तनवादी विकास घडवून आणावा. अवैध व्यवसाय बोकाळल्याने शासनाला कर मिळवून देणारे व्यवसाय अडचणीत आले आहेत.
- विवेक ताम्हणकर, जिल्हाध्यक्ष, ‘आप’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Kolhapur : 'गोकुळ' निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का? माजी अध्यक्ष डोंगळे यांचा थेट इशारा, म्हणाले 'आमच्याशिवाय पर्याय शोधल्यास...'

Asian Games : भारतीय क्रिकेटपटूच्या घराबाहेर पोहोचली तरुणी; खेळाडू श्रेयससोबत जपानमध्ये, तिचा इथे ड्रामा, नेमकं काय घडलं?

पदरात लहान मुलगी, वयही झालेलं नाही तरीही दुसरं लग्न का करत नाहीये मानसी कुलकर्णी? म्हणते, 'सासरचे मला म्हणतात...

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

SCROLL FOR NEXT